आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: मुलांच्या परीक्षाः पालकांनो या गोष्टी टाळा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘आधी तो टीव्ही बंद कर’, ‘पटकन जेवण करून अभ्यासाला बस...’ किंवा ‘सकाळी तीनलाच उठायचंय बरं का..?’ असे संवाद घरात सुरू झाले की समजावे परीक्षा जवळ आली. आणि हो, या गोष्टी अति झाल्या की टेन्शन हे येणारच... हृदयाची धडधड ही वाढणारच! २८ फेब्रुवारीपासून बारावीची परीक्षा सुरू झाली. येत्या मार्चपासून दहावीचे पेपरही सुरू होतील. परीक्षांच्या काळात नित्याने दिसणाऱ्या कुटुंबातील या वातावरणाबाबत आम्ही काही तज्ज्ञांची मते जाणून घेतली. परीक्षांच्या काळात पालकांनी नेमके काय करावे काय करू नये याबाबत विशेष वृत्त... 
 
दहावी आणी बारावीच्या परीक्षांना सुरुवात झाली आहे. पण या परीक्षांनंतर विद्यार्थ्यांना रिलॅक्स करायला मोकळा वेळ मिळतोच असे नाही. कारण त्या परीक्षांनंतर सुरू होते, सीईटीची गडबड. परीक्षांच्या या काळात विद्यार्थ्यांनी तणावमुक्त असणे फार गरजेचे आहे. त्यात पालकांची अत्यंत महत्त्वाची भूमिका असू शकते. कारण अनेकदा मुलांच्या आधी पालकांनीच मुलांनी काय करायचे आणि काय करायचे नाही हे ठरवून टाकलेले असते. त्यामुळे मग त्यांनी ठरवलेल्या मार्गावर धावताना मुलांची अनेकदा अशी काही दमछाक होते की त्यांना त्यातून लवकर सावरणे कठीण होऊन बसते. 
 
परीक्षांच्या काळात विद्यार्थ्यांनी तणावमुक्त राहावे यासाठी किंवा पालकांनी कळत नकळतणे मुलांवर दबाव आणू नये हे सर्वाधिक गरजेचे आहे. पण त्यासाठी नेमके काय करायला हवे हे अनेकदा माहिती नसते. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांना मार्गदर्शन करण्यासाठी दिव्य मराठी वृत्तपत्राच्या 'डीबी स्टार'मध्ये रविवार 5 मार्च 2016 पासून 'परीक्षा पाल्याची, पालकांची' हे सदर सुरू करत आहोत. शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ या सदरात तुम्हाला मोलाचे मार्गदर्शन करतील. तसेच तुमचे काही प्रश्न असतील तर तेही तुम्हाला विचारता येतील. त्यावर हे तज्ज्ञ तुम्हाला मार्गदर्शन करतील. 
 
सुखी आयुष्य जगण्यासाठी विद्यार्थ्याला गुणपत्रक देणारे शिक्षण आवश्यक आहे की व्यावहारिक- वैज्ञानिक ज्ञानासह त्याच्या स्किलला तासणे महत्त्वाचे आहे, हे पालकांनी ठरवले पाहिजे. आता कोणत्याही शाखेच्या पदवीचे शिक्षण घ्यायचे म्हटले तर ‘सीईटी’ महत्त्वाची ठरते. असे असताना आपसूकच दहावी बारावीचे महत्त्व कमी झाले आहे. पालकांनाही हे कळते, मात्र तरीही त्यांचा पाल्यांवरचा दबाव कमी होत नाही. जगातील यशस्वी लोकांची यादी काढली तर त्यातील बहुतांश परीक्षेच्या मार्कांबाबत जेमतेमच असलेले दिसतील. मुळात आपल्यात असणाऱ्या एखाद्या नैपुण्यावर, कौशल्यावर आपले भवितव्य अवलंबून असते. स्वत:च्या अपेक्षांच्या आेझ्याखाली पाल्यांच्या नैपुण्याला दाबणे योग्य नाही. तणावमुक्त आनंदी वातावरणात दिलेली परीक्षा अधिक चांगला निकाल देऊ शकते. 
 
विद्यार्थी अनेकदापेपरवरून आल्यावर पालकांना त्याची प्रश्नपत्रिका तपासण्याची सवय असते. कोणता प्रश्न कसा सोडवला, किती लिहिला हे पाल्यांना विचारल्यावर तो गोंधळून जातो. जे लिहिले ते व्यक्त करताना चूक झाल्यावर पालक त्याच्यावर दबाव टाकण्याची शक्यता असते. या सगळ्या प्रकारामुळे विद्यार्थ्याचा पुढच्या पेपरला जाण्याआधी आत्मविश्वास खचतो. हा प्रकार टाळायला हवा. नित्याचा दिनक्रम परीक्षेच्या दिवसांतही कायम ठेवला तर परीक्षेची भीती आपसूक कमी होते. मन शांत ठेवल्यास घरातील वातावरण आनंदी ठेवल्यास पाल्यांना नक्कीच खेळीमेळीच्या वातावरणात परीक्षा देता येते.
- हेरंब कुलकर्णी, शिक्षणतज्ज्ञ (अकोले जि.अहमदनगर) 
 
पालकांनो, जरा या बाबीही लक्षात ठेवा... 
- घरातील वातावरण खेळीमेळीचे ठेवा, भांडणे टाळा. 
- घरात परीक्षार्थी असेल तर प्रसन्नत वातावरण निर्माण करावे. 
-  पाल्याची इतरांशी तुलना टाळावी. त्याच्यातील चांगल्या गोष्टी शोधून त्याला प्रोत्साहन द्या. 
-  अभ्यासात मुलगा- मुलगी असा भेद करू नका. दोघांना समान वागवा. 
-  परीक्षेच्या काळात टीव्ही, मोबाइल, इंटरनेट बंद ठेवा. 
- मुलांना उपासतापास करू देऊ नका. त्यांना योग्य आहार आणि पुरेशी झोप घेऊ द्या. 
- मुलाला अभ्यासासाठी वेळेचे नियोजन करण्यास मदत करा. 
-  घरी अभ्यासाला जागा नसेल, तर परिसरातील अभ्यासिका शोधा. 
- परीक्षेच्या काळात ‘अभ्यास म्हणजे अभ्यास’ असे सूत्र ठेवून विद्यार्थ्यावर दबाव टाकू नये. 
- थोड्या वेळाचा खेळ किंवा टीव्ही पाहणे मनाला ताजेतवाने करते. त्यामुळे या गोष्टींसाठी पाल्यांवर दबाव टाकू नये. 
 
आम्हीही आहोत तुमच्याबरोबर... 
परीक्षादेण्याबाबत विद्यार्थी पालकांना अनेक प्रश्न पडतात. तर मग वाट कसली बघताय... आम्हीही तुमच्याबरोबर आहोत. बिनधास्त विचारा तज्ज्ञांना..! आम्ही तुमचे सगळे प्रश्न तज्ज्ञांपर्यंत पोहोचवू... प्रश्न विचारण्यासाठी dbstar@dbcorp.in किंवा ७७२००३७००७ या मोबाइल क्रमांकावर फक्त ‘एसएमएस’ करू शकता. योग्य प्रश्नांचे समाधान तर होईलच, मात्र त्यातील निवडक प्रश्नांना प्रसिद्धीही देण्यात येईल. 
 
पुढील स्लाइडवर वाचा तज्ञ काय म्हणतात... बघा शिक्षणतज्ज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते डॉ. संजय मालपाणी व्हिडिओच्या माध्यमातून काय सांगतात...
 
उद्याच्या अंकात विद्यार्थ्यांनी परीक्षेला सामोरे जाताना नेमके काय करावे, याबाबत तज्ज्ञांचे मार्गदर्शन... 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...