आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Exclusive Interview On Netaji Subhash Chandra Bos

नेताजींचा विमान अपघातातील मृत्यू खोटा ठरवणारे तीन पुरावे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पश्चिम बंगाल सरकारने नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याशी संबंधित ६४ गोपनीय फायली खुल्या केल्या आणि तेव्हापासून दररोज नवीन खुलासे होत आहेत. बोस कुटुंबातील प्रत्येक सदस्य या फायलींचा अभ्यास करत आहे. उपमिता वाजपेयी यांनी नेताजींचे नातू चंद्राकुमार बोस यांच्याशी चर्चा केली. त्यांच्या मते, या ६४ फायलींवरून दोन गोष्टी स्पष्ट झाल्या. पहिली-नेताजींचा मृत्यू विमान अपघातात झाला नाही. दुसरी-नेताजींच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याची उच्च स्तरावरून हेरगिरी झाली.
चर्चेचा सारांश :
- या फायलींमधील सर्वांत चकित करणारे तथ्य काय?
आतापर्यंत मी जेवढ्या फायली वाचल्या, त्यातून नेताजींचा मृत्यू १८ ऑगस्ट १९४५ ला विमान अपघातात झाला नाही, असे स्पष्ट संकेत मिळाले आहेत. इतर १५०-१६० फायली खुल्या होतील तेव्हा अशा अनेक सत्य गोष्टी समोर येतील. या फायली केंद्र सरकारकडे आहेत.

- आम्हाला तीन पुरावे मिळाले आहेत किंवा तथ्य हाती आले असे म्हणता येईल. नेताजी जिवंत होते, असे त्याआधारे सिद्ध होते.
पुढील सलाइड्सवर वाचा, नेताजी जिवंत असल्याचे ठोस पुरावे, त्यांचे नातू चंद्राकुमार बोस यांची खास मुलाखत आणि त्या गोपनीय फायलींचे सत्य... काही दुर्मीळ फोटोंसह...