आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डिजिटल अर्थव्यवस्थेच्या विस्ताराने 50 लाखांहून अधिक नाेकऱ्या; विविध क्षेत्रावर परिणाम

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाेर-जी तंत्रज्ञान अाल्यानंतर देशात स्मार्टफाेनची विक्री तर वाढलीच अाहे. साेबतच इंटरनेटचा वापरदेखील वेगाने वाढत अाहे. सध्या इंटरनेट काेणत्या ना काेणत्या माध्यमाने प्रत्येक कामाशी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे जुळलेले अाहे. मागील वर्षांत अर्थव्यवस्थेवरही यामुळे माेठ्या प्रमाणात प्रभाव पडला अाहे. नाेटबंदीनंतर उद्याेग क्षेत्रात अनेक मुद्द्यांपैकी डिजिटल पेमेंट हा एक महत्त्वपूर्ण मुद्दा हाेता. इंटरनेटच्या विस्ताराने डिजिटल पेमेंटला पेमेंटच्या एका सहज माध्यमाच्या रूपात सादर केले. अाॅनलाइन वेबसाइटवरून खरेदी, तिकीट बुक करणे वा दुकानात बिल देणे असाे, डिजिटल माध्यमांचा उपयाेग सर्वसाधारण हाेत अाहे. यामुळे देशाच्या डिजिटल अर्थव्यवस्थेला मजबूत अाधार मिळाला अाहे व अागामी वर्षांत याचा अाणखी विस्तार हाेईल. अशा स्थितीत हे राेजगाराचे एक माेठे माध्यम बनून समाेर येईल. नुकत्याच एका कार्यक्रमात माहिती-तंत्रज्ञानमंत्र्यांनी सांगितले की, डिजिटल अर्थव्यवस्थेच्या विस्ताराने देशात ५० ते ७० लाख राेजगाराच्या संधी प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे निर्माण हाेतील.

सरकारने पुढील चार वर्षांत डिजिटल अर्थव्यवस्थेला एक हजार अब्ज डाॅलर्सपर्यंत नेण्याचे लक्ष्य निश्चित केले अाहे. त्यासाठी डिजिटल पेमेंट माेठ्या प्रमाणावर साह्यभूत ठरेल. अनेक माेठ्या कंपन्यांनी डिजिटल बंॅकेची सुरुवात केली अाहे. तसेच अनेक बंॅकांनी अापले माेबाइल वाॅलेटही लांॅच केले अाहेत. एका अंदाजानुसार २०२२पर्यंत देशात माेबाइल वाॅलेट ट्रन्झॅक्शनचे मूल्य ३२ अब्ज डाॅलर्स हाेईल. डेलाॅइटनुसार हे प्रमाण १२६ टक्के दराने वाढत अाहे. देशाची डिजिटल अर्थव्यवस्था वाढण्याचे माेठे कारण इंटरनेट अर्थव्यवस्थाही अाहे. २०१६च्या अंतापर्यंत देशाची इंटरनेट अर्थव्यवस्था सुमारे ११५ अब्ज डाॅलर्स हाेती, जी २०२०च्या अंतापर्यंत  २५० अब्ज डाॅलर्सपेक्षा जास्त हाेईल.
 
डिजिटल अर्थव्यवस्थेच्या विस्ताराचा परिणाम विविध क्षेत्रांवर हाेईल. वर्ल्ड इकाॅनाॅमिक फाेरमनुसार डिजिटल अर्थव्यवस्थेत इंजिनिअरिंग, संगणक, गणित व मार्केटिंगचे काैशल्य असलेल्यांसाठी नाेकऱ्यांचे प्रमाण वाढेल. अनेक उद्याेगांत विविध विशेषता असलेल्या व्यावसायिकांनी गरज पडेल; परंतु काही जाॅब प्राेफाइलमध्ये व्यावसायिकांच्या मागणीची अधिक  शक्यता अाहे. माेबाइल मॅन्युफॅक्चरिंग व माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रात उच्च व मध्यम काैशल्ये असलेले व्यावसायिक, वेब डेव्हलपमेंट व यूअाय डिझायनिंग क्षेत्रात नाेकऱ्या असतील. 
 
इंजिनिअरिंग, अायटी व संगणक विज्ञान 
माहिती-तंत्रज्ञान व संगणक विज्ञानाच्या क्षेत्रात डाटा विज्ञान, डाटा चिकित्सा, वेब डेव्हलपर व अॅप डेव्हलपर यात व्यावसायिकांसाठी संधी वाढतील. संगणक विज्ञान पदवी मिळवल्यानंतर विद्यार्थी विशेषता मिळवण्यासाठी डिप्लाेमा करू शकतात. इलेक्ट्राॅनिक्स इंजिनिअरिंग करणारे माेबाइल मॅन्युफॅक्चरिंगच्या क्षेत्रात करिअर करू शकतात. 
 
डिजिटल मार्केटिंग व कंटेट रायटिंग
डिजिटल माध्यमांच्या वापरात अाॅनलाइन काॅमर्स बाजाराची माेठी भागीदारी अाहे. अाज अनेक कंपन्या मार्केटिंगसाठी डिजिटल माध्यमांचा वापर करताहेत. यासाठी साेशल मीडियाचा वापर वाढला अाहे. डिजिटल मार्केटिंग व्यावसायिकांसह क्रिएटिव्ह कंटेट रायटरची मागणी वाढली अाहे.
 
विविध क्षेत्रांत नाेकऱ्यांच्या संधी
यात व्यावसायिक माहिती-तंत्रज्ञान, सायबर सुरक्षा, बंॅकिंग व फायनान्शियल तंत्रज्ञान, ई-काॅमर्स, माेबाइल मॅन्युफॅक्चरिंग कंपन्यांसहल डिजिटल मीडिया व जाहिरात क्षेत्रात नाेकरी करू शकतात. याशिवाय अनेक कंपन्या केवळ वेब डेव्हलपमेंट, अॅप डेव्हलपमेंट किंवा यूअाय व यूएक्स डिझायनिंगवर काम करत अाहेत. विशिष्ट काैशल्य असलेले व्यावसायिक यात नाेकरी करू शकतात.

प्रारंभी २.५ ते ३ लाख रुपये वार्षिक पॅकेज
विविध क्षेत्रे, कंपन्या व जाॅब प्राेफाइलनुसार वेतन पॅकेज वेगवेगळे असू शकते. करिअरच्या सुरुवातीला किमान २.५ लाख रुपये वार्षिक पॅकेज मिळू शकते. तसेच काही वर्षांच्या अनुभवानंतर ते ५ ते ६ लाख रुपये वार्षिक हाेऊ शकते. तथापि, माेठ्या पदांसाठी ते जास्त असू शकते.
बातम्या आणखी आहेत...