आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिलांना आपल्या पतीत कडून असतात सरासरी 4 अपेक्षा; पुरुषांच्‍याही असतात काही अपेक्षा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन- लग्नानंतर पती-पत्नीला एकमेकांत काय बदल हवे असतात? या विषयावरून झालेल्या एका सर्व्हेत रोचक गोष्टी समोर आल्या आहेत. लग्नानंतर पतीने त्याच्या किमान चार सवयी बदलाव्या, असे पत्नीला वाटते. दुसरीकडे, पत्नीने किमान सहा सवयी बदलाव्या, अशी पतीची अपेक्षा असते. ३५% पत्नींना वाटते की पतीने छोट्या-मोठ्या गाेष्टींवरून नाराज होऊ नये. ३०% पत्नींना अपेक्षा आहे की, पतीने आपले म्हणणे लक्षपूर्वक ऐकावे. २३% पतींना वाटते की पत्नींनी आपल्यावर त्यांच्यापेक्षा जास्त प्रेम करावे.

बहुतांश पत्नींना वाटते की पतीने लग्नाआधीच्या वाईट सवयी सोडाव्यात. त्यांनी त्यांची स्तुतीही करावी. दुसरीकडे, पतीसाठी पत्नीचे समाधान हे सर्वतोपरी आहे. २३% पतींनुसार आपल्या बायकोने इतरांच्या बायकांपेक्षा जास्त खुश राहावे. याशिवाय तिने ग्लॅमरस कपडे घालावे व टीव्ही मालिका कमीच पाहाव्यात. आपल्याला योग्य जोडीदार मिळेल की नाही, असा संभ्रम १३% लोकांना होता.

ब्रिटिश संस्था जिंजरने फक्त नवपरिणीतांवरच हा सर्व्हे केला. सर्व्हेनुसार पुरुषांना आपल्या जोडीदाराकडून स्नेहाची सर्वाधिक गरज असते. महिला आणि पुरुषांच्या विचारसरणीत थोडासाच फरक असतो, त्यांनी एकमेकांना समजून घेण्याची गरज आहे.
 
पत्नीला पतीकडून असतात या अपेक्षा...
- ३५% महिलांना वाटते पती कमी संतापी असावा. 
- ३०% जणींना वाटते आपले म्हणणे पतीने ऐकावे. 
- २५% महिलांनुसार पतीने वाईट सवयी सोडाव्या. 
- २५ % महिलांना पतीकडून स्तुती हवी असते. 
- २१% जणींनुसार घरकामात पतीने सोबत करावी. 
- १४% वाटते की नवऱ्याने पौष्टिक अन्न खावे.
- १३% जणींना वाटते पतीने कमी खर्च करावा.
- १२% जणींनुसार, पतीने आपला अपमान करू नये.
- १२% जणींना वाटते पती भावुक व समंजस असावा.
- ११% महिलांना वाटते की, आपण पाहत असलेला टीव्ही कार्यक्रमच नवऱ्याने पाहावा.
- ११% महिलांनुसार पतीने धूम्रपान करू नये. 
- ५% महिलांना वाटते की पतीने दाढी ठेवू नये.
 
पतीच्या पत्नीकडून असलेल्या अपेक्षा
-  २३% पत्नीने आपल्यावर मनातून प्रेम करावे.
-  २२% आपली पत्नी सतत आनंदी राहावी.
-  १८% आपण घरी असताना ती जवळपास असावी.
-  १७%  पत्नीने नेहमी आपले गुणगान करावे.
-  १६% पत्नीची जीवनशैली अत्यंत चांगली असावी.
-  १६% पत्नी कधीच थकलेली दिसू नये. 
-  १६% पत्नीने नेहमी ग्लॅमरस कपडे घालावेत.
-  १३% पत्नीने सतत चेष्टा-मस्करी करावी.
-  १३% आपली पत्नी एखाद्या गोष्टीबाबत फार आग्रही आणि हट्टी नसावी.
- १२% पत्नीने स्थूलपणाकडे अधिक लक्ष द्यावे.
- १०% पत्नीने स्पोर्ट‌‌्सला सतत पसंतीक्रम द्यावा.
- ९% पत्नीने आपला नेहमी मान राखावा.
बातम्या आणखी आहेत...