आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिकेत संशोधनावरील खर्च घटला

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रिन्स्टनमध्ये अ‍ॅडव्हान्स्ड स्टडी इन्स्टिट्यूट एखादे विद्यापीठ किंवा संशोधन केंद्र नाही. मात्र, असे ठिकाण आहे जिथे 200 पेक्षा जास्त प्रतिभावान वेगवेगळ्या ठिकाणी काही वेगळे शोधण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. येथे अल्बर्ट आइनस्टाइनदेखील शिकले आहेत. संस्थेत संशोधकांना अटी-शर्तीविना संशोधनाची सुविधा उपलब्ध आहे. तरीही संस्थेचे महत्त्व पूर्वीसारखे राहिलेले नाही.


संस्थेचे नवे संचालक रॉबर्ट दिजग्राफ सांगतात, संशोधन प्रात्यक्षिकाच्या प्रमाणात तपासून पाहिले असता (उदाहरणार्थ लॅपटॉपला स्लिम बनवणे) अथवा थेअरी (उदाहरणार्थ अंतराळात एखाद्या वस्तूची हालचाल) यादृष्टीने पाहिल्यास काम करण्यासाठी यापेक्षा योग्य ठिकाण कोणतेच नाही. 33 नोबेल पुरस्कार विजेते आणि 1936 नंतर गणिताचा सर्वोच्च सन्मान फिल्ड्स मेडल जिंकणारे दोन तृतीयांश विजेते येथूनच बाहेर पडले आहेत.


संस्थेचे भविष्य 65 कोटी डॉलरच्या अनुदानामुळे सुरक्षित आहे; परंतु काम विकसित करण्याच्या पद्धतीमुळे तिचे भविष्य अंधारलेले आहे. अमेरिकन सरकारने गेल्या दशकात संशोधनावरील खर्च घटवला आहे. इकडे युरोप आणि आशियाचे काही देश प्रगतीच्या दिशेने आगेकूच करत आहेत. तंत्रज्ञान व विकास ग्रुप बटेल्ले यांच्या मते 10 वर्षांत संशोधनावर चीनचा खर्च अमेरिकेपेक्षा जास्त असेल. संशोधनाच्या बाबतीत अमेरिका मागे पडत आहे. 2000 ते 2010 दरम्यान विज्ञान-अभियांत्रिकी क्षेत्रात अमेरिकेला मिळालेल्या प्रशस्तिपत्रांत घट झाली आहे. युरोपियन देश त्या तुलनेत चांगल्या स्थितीत आहेत.


प्रिन्स्टन संस्था कधी अमेरिकन नाविन्याच्या शक्तीचे प्रतीक होती, ती आता स्पर्धेत राहण्यासाठी अमेरिकेसमोरील काही कडवट प्रश्नांचे प्रतिबिंब ठरली आहे. 1930मध्ये शिक्षणतज्ज्ञ अब्राहम फ्लेक्सनर आणि डिपार्टमेंटल स्टोअरची शृंखला चालवणारे बंधू लुइस बामबर्जर आणि केरोलिन बामबर्जर फुल्डने संस्थेची स्थापना केली होती. अणुबाँबचे जनक आणि संस्थेचे संचालक ओपनहायमरने याला वैचारिक हॉटेलची उपाधी दिली होती. दुस-या महायुद्धाच्या काळात नाझीपासून पळणा-या गणिततज्ज्ञ आणि पदार्थवैज्ञानिकांचे आकर्षणाचे ई केंद्र होते. संस्थेत आज इतिहास, गणित, समाजशास्त्र, निसर्गविज्ञान आदी विषयांचे 28 कायम शिक्षक आहेत. फेलोशिपसाठी निवडलेले 200 इतर सदस्य आहेत.


विज्ञानात वॉशिंग्टनची आवड घटण्यासोबतच राजधानीत संस्थेचे महत्त्व कमी झाले आहे. गेल्या 25 वर्षांत पदार्थविज्ञान संशोधनात अमेरिकन सरकारचा खर्च निम्मा झाला आहे. चीनमध्ये खासगी आणि सरकारी खर्च दरवर्षी वीस टक्के वाढत आहे. अमेरिकन खर्चात 5 टक्क्यांनी वाढ होत आहे. संशोधन खर्चातील कपातीने पायाभूत शोधप्रकल्पांवर परिणाम होतो. पायाभूत विज्ञानातून लाभासाठी कित्येक वर्षे जातात. मात्र, त्यातून अनेक महत्त्वपूर्ण संशोधनाची दारे उघडली आहेत.
1940 मध्ये भौतिकशास्त्रज्ञ चुंबकीय क्षेत्रावर संशोधन करत होते. त्यातून वर्ल्ड वाईड वेबचा शोध लागला. आइनस्टाइनच्या सापेक्षतावादाच्या सिद्धांताच्या परीक्षणासाठी बनवलेल्या आण्विक घडाळ्यांनी जीपीएसचा शोध लागला. मॅसाच्युसेट्स तंत्रज्ञान संस्थेचे मार्क केस्टनर म्हणतात, विज्ञानसमाज तर राहीलच; पण
देशात क्रांतिकारी शोध बंद होतील. दिजग्राफ म्हणतात, काळ भौतिकशास्त्रासाठी अनुकूल आहे. हिग्स बोसोनच्या शोधाने ब्रम्हांड समजण्याच्या जवळ नेले आहे. अशा वेळी मागे हटणे शहाणपणाचे नाही.