आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चेहर्‍याच्या सूजेपासून अशी मिळवा मुक्ती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चेहर्‍यावरील सूज ही महिलांमध्ये आढळणारी सर्वसाधारण समस्या आहे. त्याची कारणे अनेक असली तरी त्यावरील उपचार मात्र खूपच सोपे आहेत.

लिक्विड कमी होणे : आपल्यापैकी बहुतांश जणी वातानुकूलित खोलीमध्ये काम करतात त्यामुळे तहान लागत नाही. परिणामी चेहर्‍याचा रंग पिवळा पडू लागतो आणि सूजसुद्धा दिसायला लागते. तसे दिसताच भरपूर पाणी प्या. जर लघवीचाही रंग पिवळा असेल, तर द्रवरूप आहार वाढवावा लागेल. नारळ पाणी, लिंबू पाणी, ग्रीन टी आणि 8 ते 10 ग्लास पाणी दररोज पिल्यास या समस्येतून तुमची सुटका होऊ शकते. त्यासोबतच क आणि ई जीवनसत्त्वांचे मॉश्चरायझरही वापरू शकता.
जास्त मीठ खाण्याचे परिणाम : दररोज आपण 1200 मिलिग्राम मीठ खाणे आवश्यक आहे. जास्त प्रमाणात मीठ खाल्ल्यामुळे शरीरातून पाणी निघू लागते आणि सूज वाढत जाते. आपल्या खानपानावर लक्ष द्या. अशावेळी लिम्फेटिक ड्रेनेज फेशियल्समुळे फायदा होऊ शकतो.

अ‍ॅलर्जीची प्रवृत्ती : काही लोकांना अ‍ॅलर्जीचा त्रास असल्यामुळे वारंवार सर्दी, शिंक येणे सुरू होते. धूळ, दुर्गंधी, धूर किंवा परफ्युमही त्यामागील कारण असू शकते. यामुळेही चेहर्‍यावर सूज येते. त्यासाठी अ‍ॅलर्जी कशी होते, हे लक्षात ठेवा. ती रोखण्यासाठी आधी गोळ्या घ्या किंवा डॉक्टरांना दाखवावे.

हार्मोन्सचे असंतुलन : कित्येकदा हार्मोन्सच्या असंतुलनामुळेही चेहर्‍यावर सूज दिसू लागते. कित्येकदा मासिकपाळीच्या आधी सूज दिसते. पोलिसिस्टिक ओवेरियन सिंड्रोम किंवा थायरॉइड डिसऑर्डर महिलांमध्ये सामान्य असते. औषधींव्यतिरिक्त भरपूर पातळ पदार्थ घेणे आणि नियमित व्यायाम करणे आवश्यक आहे.
प्रिव्हेंशन नियतकालिकामधून

डॉ. रेखा शेठ
कॉस्मेटिक ड्रमॉटोलॉजिस्ट, मुंबई