आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Facts About Mahatma Gandhi On His Death Anniversary

वकिली करताना गांधीजींनी मिळत होते 12 लाखांचे पॅकेज, वाचा FACTS

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महात्मा गांधी यांनी अहिंसेच्या मार्गाने ब्रिटीशांची भारतातील सत्ता उलथून लावली होती. भारतात येण्यापूर्वी महात्मा गांधी हे दक्षिण आफ्रिकेमध्ये वकिली करत होते. मात्र भारतात आल्यावर त्यांनी भारतीय स्वातंत्र्यसंग्रामाचे नेतृत्व केले. भारताच्या स्वातंत्र्यासाठी आयुष्य वाहिलेले राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची 30 जानेवारी रोजी हत्या झाली होती. 1948 साली याच दिवशी महात्मा गांधींची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. त्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने त्यांच्याशी संबंधित काही खास गोष्टींवर आपण नजर टाकणार आहोत.
इतिहासातील सर्वात मोठी अंत्ययात्रा
महात्मा गांधींची अंत्ययात्रा ही आजवर निघालेल्या अंत्ययात्रांच्या तुलनेत सर्वात मोठी समजली जाते. ही अंत्ययात्रा सुमारे 8 किलोमीटर लांब होती.

स्वातंत्र्य मिळाले तो क्षणही साजरा केला नाही...
गांधीजींनी स्वातंत्र्य मिळाला तो क्षण साजरा केला नव्हता. त्यांनी जवाहरलाल नेहरूंचे पहिले भाषणही ऐकले नव्हते. हा आनंद साजरा करण्याऐवजी ते बंगालमध्ये सुरू असलेल्या दंगली रोखण्यासाठी उपोषणाला बसले होते.
पुढील स्लाइड्सवर वाचा, महात्मा गांधींशी संबंधित इतर काही महत्त्वाचे Facts