आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

FACTS: 'प्लेबॉय' मासिक

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

* प्लेबॉय या अमेरिकन मासिकाने अलीकडेच इस्रायलमध्ये हिब्रू या स्थानिक भाषेत पहिली आवृत्ती काढली. यामध्ये इस्रायलच्या अनेक मॉडेल्सचा समावेश असून तेथील स्थानिक लेखकांनी त्यासाठी लेखनही केले आहे. मात्र, हे मासिक हिब्रू भाषेत प्रकाशित होताच समाजकंटकांच्या पोटात दुखायला लागले. प्लेबॉय हे अमेरिकेच्या पुरुषांसाठी काढले जाणारे मासिक आहे.

* या मासिकाचा पहिला अंक 1953 मध्ये ह्युग यांनी त्यांच्या आईकडून 1000 डॉलरचे कर्ज घेऊन काढला होता. पहिल्या अंकाच्या मुखपृष्ठावर र्मलिन मन्रोचे छायाचित्र होते. आता प्लेबॉय जगामध्ये सर्वाधिक विकल्या जाणारे पुरुषांचे मासिक बनले आहे. या मासिकामध्ये दर महिन्याला एका सेलिब्रिटीची मुलाखत प्रकाशित केली जाते.