Home »Divya Marathi Special» Fai Ghulam Nabi And Kasmir Issue

विचार भारताचा : फई प्रकरण - 'युजफुल इडीयटस'वर कारवाई करणार काय ?

सोनोरिटा चौहान मेहता | Jul 23, 2011, 05:31 AM IST

  • विचार भारताचा : फई प्रकरण - 'युजफुल इडीयटस'वर कारवाई करणार काय ?

काश्मीर अमेरिकन कौन्सिल आणि गुलाम नबी फई याच्या विशेष सभांना हजेरी लावलेल्या लोकांची यादी मोठी आहे. आणि ही यादी 'प्रतिष्ठितांची' आहे. शक्तिशाली मीडिया हाऊसने आयोजिलेल्या गुप्त सभेत या अतिथींचा सहभाग होता. आयएसआयच्या निधीवर चालणा-या या संस्थेत भारतविरोधी संमेलने व्हायची. एफबीआयच्या आरोपपत्रानुसार, फई याने 40 लाख डॉलर्सचा खर्च अमेरिकेचे काश्मीरविषयीचे धोरण पाकिस्तानधार्जिणे व्हावे यासाठी केला आहे. ही रक्कम त्याला आयएसआयने पुरवली होती. या पार्श्वभूमीवर कॅपिटल हिल येथील परिसंवादांना कोणी कोणी हजेरी लावली ते पाहा..
दिलीप पाडगावकर. वरिष्ठ पत्रकार. जम्मू काश्मीर प्रश्नाच्या समाधानासाठी सरकारने नियुक्त केलेले समन्वयक.
हरीष खरे.पंतप्रधानांचे मीडिया सल्लागार.
न्या. राजिंदर सच्चर. भारतीय मुस्लिमांच्या स्थितीविषयीच्या सच्चर समिती अहवालाचे लेखक.
वेद भसिन.काश्मीर टाईम्सचे संपादक.
सुब्रमण्याम स्वामी. जनता दल संयुक्तचे अध्यक्ष.
कुलदीप नय्यर. इंग्लंडमधील भारताचे माजी उच्चायुक्त.
गौतम नवलखा. मानवाधिकार चळवळीतील कार्यकर्ता.लक्षातअसू द्या की या परिसंवादासाठीचा संपूर्ण खर्च फईच्या संस्थेने केला होता... प्रवासखर्चासहित. या यादीतील लोकांना मीडियातील एका वर्गाकडून 'यूजफुल इडियटस' अर्थात 'कामाचे मूर्ख' या संबोधनाने ओळखले जाते. पाश्चिमात्य देशांमध्ये नेहमी रशियाची तळी उचलणा-या लोकांसाठी 'यूजफुल इडियटस' हा शब्दप्रयोग केला जातो. हे यूजफूल इडियटस रशियाला समर्थन देतात, रशियासाठी बदनामीची मोहिम चालवतातइतकेच नाही रशियाच्या भल्यासाठी प्रचारमोहिमही राबवितात. असो.
धक्कादायक बाब म्हणजे या यादीतील एखाद्या नावाचा अपवाद वगळता बहुतेकांचा काश्मीरविषयक ध्येयधोरणे ठरविण्यात थेट सहभाग आहे. इतकेच नाही तर संवेदनशील मुद्दयांवर जनमत तयार करण्यात हे लोक निपूण आहेत. याहून अधिक गंभीर आणि चिंताजनक बाब म्हणजे फईच्या सभांना हजेरी लावलेल्या काही महाभागांनी केलेले स्वताचे लंगडे समर्थन होय.
दिलीप पाडगावकर म्हणतात, मला याची कल्पनाच नव्हती. फईची पार्श्वभूमी माहीत असती तर मी सभांना हजेरी लावली नसती.
कुलदीप नय्यर म्हणतात, फईबद्दल मला संशय आला नाही. असा श्रीमंत मनुष्य आयएसआयचा हस्तक असेल असे मला वाटले नाही. खूप दिवसांपूर्वी मी त्याच्या परिसंवादाला हजर होतो. तो खूपच शालीन वाटला. या परिसंवादात पाकिस्तानीही होते, परंतु भारतविरोधी सूर वगैरे तसले काही तिथे नव्हते. मीही मला वाटते ते मोकळेपणाने तिथे बोललो.
पंतप्रधानांच्या मीडिया सल्लागाराची
प्रतिक्रियाअद्याप आलेली नाही. या सगळ्यात सुब्रमण्यम स्वामी या एकमेव व्यक्तीने आपल्या अधिकृत संकेतस्थळावर आपली भूमिका मांडल्याचे दिसते. सुब्रमण्यम स्वामींनी म्हटले आहे की, फईने आयोजित केलेल्या परिसंवादात सहभागी होण्यापूर्वी मी भारतीय दूतावासाचा सल्ला घेतला होता. इतकेच नाही तर दूतावासातील एक अधिकारी 'टिपणे काढण्यासाठी आणि परिसंवादात आवश्यक तेव्हा सल्ला देण्यासाठी' सोबत नेला होता. काश्मीर हा कायदेशीररीत्या भारताचाच अविभाज्य भाग आहे, हा मुद्दा मी तिथे मांडला.फई हापरकीय शक्तीचा एजंट आहे हे माहीत नसल्यानेच आपण त्या परिसंवादात गेलो होतो.
वरील लब्ध प्रतिष्ठित लोकांनी तकलादू बचाव करणे चालणार नाही. भारताचा एक नागरिक म्हणूनही शत्रूशी हातमिळवणी करणे गंभीर आहे. फईचा विषय वाढू नये यासाठी नाना उपदव्याप केले जातीलही. परंतु असे करून धगधगत्या प्रश्नांकडे कानाडोळा कसे करता येईल.
1. गुप्तहेर सूत्रांनुसार, फई हा आयएसआयने पेरलेला हस्तक आहे आणि गेल्यावर्षी काश्मीरमध्ये घडवून आणण्यात आलेल्या दगडफेक आंदोलनामागेही फई आहे, हे सत्य काही लपून राहिलेले नव्हते. असे असताना या प्रतिष्ठित विचारवंतांनी परिसंवादांमध्ये भाग घेण्यापूर्वी फईच्या मनसुब्याला धुळीस मिळविण्याचा प्रयत्न का केला नाही. फईचा पाकिस्तानकडे असलेला झुकाव आणि त्याच्या संशयास्पद कारवाया जगजाहीर असताना, यातले बरेच जण कसे म्हणू शकतात की, त्याचे आयएसआयशी लिंक असल्याचे आम्हाला माहीतच नव्हते.
2. एकवेळ मान्य करू की, या लोकांना फईच्या मागील आयएसआयचे षडयंत्र माहित नव्हते, आता तर या कारस्थानावरचे कुटील आवरणही दूर झाले आहे. अशा स्थितीत या परिसंवादाला उपस्थिती दर्शविलेल्यांनी माफी
जाऊ द्या, किमान खेद तरी व्यक्त केला आहे काय ? अजाणतेपणीही एखाद्या भारतीय नागरिकाकडून अशी चूक झाली तर शरमेने त्याचे मान खाली गेले पाहिजे. येथे तरवरीलयादीतील अनेक महाभागांनी फुटीरवाद्यांना पूरक ठरणारी भूमिका उदारमतवादाच्या बुरख्याआडून सतत मांडले आहे. ज्या माणसाच्या प्रमुखांनी या देशाविरुद्ध युद्ध छेडले आहे, आजवरच्या तीन युद्धात अगणित भारतीयांना प्राणास मुकावे लागले आहे, असंख्य अतिरेकी हल्ले घडवून आणण्यात येत आहे. ही यादी आणखीही वाढविता येईल.
3. स्वत:च्या उदार विचारांमुळे ही मंडळी अजाणतेपणाने का होईना शत्रूच्या हातातील प्यादे बनली आहेत. या मंडळींच्या कृतीमुळे या देशाचे काय आणि किती नुकसान झाले याची चौकशी करण्यात यावी अशी मागणी पहिल्यांदा याच मंडळींनी का करू नये ? दिलीप पाडगावकर यांनी आतापर्यंत राजीनामा द्यायला नको का ? त्यांचे समन्वयक सहकारी अन्सारी राजीनाम्याचा विचार करीत असावेत असे दिसते.
4. या सर्व प्रकरणावर सरकारचे मौन हे अतिशय भयानक आणि गंभीर आहे. ही कृत्रिम शांतता आहे काय ? की
सरकारच्याडिफॉल्ट सेटींगसाठीची शांतता आहे ? दोषींविरुद्ध कारवाई करण्यात अडचण काय आहे ? किमान निषेध तरी करणार का ?
5. सत्ताधारी सोडा भाजपाचाही आवाज बसला आहे काय ? नाही म्हणायला प्रकाश जावडेकर यांनी एक प्रतिक्रिया दिली आहे. भाजप कर्नाटकातल्या दलदलीत फसल्यामुळे या गंभीर विषयाकडे भाजपाचे दुर्लक्ष होत आहे.
6. खरे तर अमेरिकेला फईच्या कारवाया अनेक दशकांपासून माहीत आहेत. सध्या अमेरिका पाकिस्तान रोमान्सचा शेवट होतोय म्हणूनच अमेरिकेने फई प्रकरण आता जगासमोर आणले. काश्मीर प्रकरणी अमेरिकेकडून काही अपेक्षा ठेवणे हेच मूर्खपणाचे आहे. त्यांचे 'सहकार्य' कसे असते हे आपल्याला हेडली प्रकरणातून समजले आहेच. आपण आता तरी शहाणे होणार का हा खरा प्रश्न आहे.
7. एकूणच काय तर आपण शेवटी स्वत:लाच मूर्ख बनविणा-या मुद्दयाजवळ येऊन थांबतो. केवळ प्रवासखर्चासह सर्व खर्च फई किंवा त्याची संस्था करणार म्हणून त्याची भूमिका संदिग्ध असतानाही ही मंडळी परिसंवादात सहभागी झाली असे म्हणावे का ? अन्यथा भारत विरोधी परिसंवादात सहभागी होण्यामागे या लोकांची प्रेरणा काय ? काश्मीरला आंतरराष्ट्रीय मुद्दा बनविणे आणि फईच्या संस्थेला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळावी यासाठी परिसंवादांमध्ये सहभाग घेतला ? की 'अर्थपूर्ण' किंवा 'इतर' व्यवस्था व्हावी यासाठी ? लोकांमध्ये प्रतिष्ठेचा झगा पांघरून ही मंडळी लोकांमध्ये पुन्हा उजळ माथ्याने वावरतील. त्यांना आता वाईट कृत्यात पकडल्याने त्यांनी बनावटगिरी न करता लोकांच्या प्रश्नांना उत्तरे दिली पाहिजेत.
फईचे प्रकरण दाबण्यासाठी, विस्मरणात नेण्यासाठी सत्ताधारी, आणि यात गुतलेली मंडळी छल करतील. भारताचीच काय काश्मिरच्या भवितव्याशीही या मंडळींचे काही देणेघेणे नाही. परंतु या लोकांच्या कृत्याने देशाचे किती नुकसान झाले हे या मंडळींना कसे कळणार ?आपले मतस्वत:लासेक्यूलरसिद्ध करण्यासाठी दिलीप पाडगावकर आणि कंपनी काश्मीर प्रश्नी देशहिताला नख लावतात असे तुम्हाला वाटते का ? उदारमतवादी आणि मानवाधिकार अशा शब्दांना ही मंडळी बदनाम करताहेत असे वाटते का ? तुम्हाला काय वाटते ? केंद्र सरकार फई प्रकरणी कचखाऊ धोरण ठेवण्याचे काय कारण असेल ? दिव्य मराठीच्या व्यासपीठावर आपली मते अवश्य मांडा. हे आपले हक्काचे व्यासपीठ आहे. आक्षेपार्ह मतांसाठी संबंधित व्यक्ती स्वत: जबाबदार असतील.Next Article

Recommended