आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अपयश हा आयुष्यातील परिवर्तन बिंदू असू शकतो

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कधीही न कोसळणे किंवा अपयशी न होणे यात फार मोठेपणा नाही. याउलट कोसळल्यानंतर पुन्हा उभे राहण्यात माहात्म्य आहे. आयुष्यात तुम्ही सात वेळा कोसळला असाल तर 8 वेळा उठून उभे राहा. पुन्हा उठणे म्हणजे प्रत्युत्तर देणे. आयुष्याला नेहमी हेच उत्तर द्या- मी पुन्हा एकदा जगण्यासाठी सज्ज आहे.


स्प्रिंग कितीही निबर असली तरी ताणमुक्त केल्यास तेवढ्याच वेगाने परत येते. दु:खामुळे ताण आल्यासारखे वाटल्यास त्याच जोमाने उत्साही व्हा. तेवढ्याच वेगाने परत येऊन आयुष्याचा सामना करा.
काल भूतकाळात गेला. आज एक नवा दिवस आहे. नवी सुरुवात करू शकता. इतिहासातही कोसळल्यानंतर पुन्हा सावरण्याचेच दाखले आहेत. मी माघार घेणार नाही, तोवर कुणीही मला मागे सारू शकत नाही. इतरांनी तुम्हाला कितीही वेळा मागे ढकलले, तरी फरक पडत नाही. ‘मी पुन्हा परतेन, तेव्हा इतरांना माझे अस्तित्व स्वीकारावेच लागेल’ अशी जिद्द बाळगा.


एखादे काम सुरुवातीलाच संपले तर? प्रत्येक समाप्तीनंतर एक नवी सुरुवात असते. त्यामुळे प्रत्येक समाप्तीला एक नवे वळण देता येऊ शकते. अपयशाकडे वेगळ्या दृष्टिकोनातूनही पाहता येऊ शकते. तो परिवर्तन बिंदूही असू शकतो. एखादा दगड नष्ट करूनच एक नवे शिल्प घडवले जाते. जुन्या गोष्टी नष्ट झाल्यानंतरच नव्या गोष्टींची सुरुवात होऊ शकते. मी पुन्हा परतणार, या सत्याची जगाला जाणीव करून द्या.


आयुष्यात अनेकदा आपल्याला इच्छित फळ मिळत नाही. याउलट त्यापासून एक नवा धडा मिळत असतो. तो आवश्यक असतो. काही अडथळे पार केल्यानंतर आपले व्यक्तिमत्त्व कणखर बनत असते. व्यायाम प्रशिक्षक तुमचे स्नायू बळकट करण्यासाठी तुम्हाला अवघड व्यायाम करण्यास सांगतात, त्याचप्रमाणे आयुष्य म्हणजे व्यक्तिमत्त्वाची ‘जिम’ असते.


आयुष्य आपल्याला आध्यात्मिक शक्ती मिळवण्याची संधी देण्याची संधी देत असते. त्यात कोसळून पुन्हा उभे राहण्याची शक्ती असते. विजयातूनही मिळणार नाही, असा अनुभव एखाद्या पराभवातून मिळू शकतो. पराभवातून परिपक्वता येते आणि त्यातूनच पुन्हा सावरण्याची अभूतपूर्व शक्ती संचारते. नेहमी जिंकणारा हारतो, तेव्हाच तो पुन्हा जिंकण्यासाठी जोमाने तयारी करतो. उत्कृष्ट परिणाम देणे, हाच जगाला चोख उत्तर देण्याचा एकमेव मार्ग आहे, हे विजेत्याला ठाऊक असते. कोणत्याही कठीण परिस्थितीत जगाला ‘मी पुन्हा परतेन, नक्की परतेन’ हेच उत्तर देत राहा.