आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Academy Denies Ruby's Charges But Admits Security Lapses

रुबीचा रुबाब; ट्रेनी आयएएसना धडकी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डेहराडून - मसुरीच्या लालबहादूर शास्त्री प्रशासकीय अकादमीतील चर्चित चेहरा रुबी चौधरीला अनेक प्रशिक्षणार्थी आयएएस मुलींनी विचारणा केली की, ती कोण आहे? उत्तर देतानाचा आत्मविश्वास आणि निर्ढावलेपणामुळे ऐकणार्‍याचा संशय हवेत विरून जातो.

१९ डिसेंबर २०१४ रोजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी अकादमीत येण्याआधी दोन दिवस तयारी सुरू होती. यादरम्यान एका प्रशिक्षणार्थी आयएएसने रुबीला पाहून प्रश्न विचारला, हू आर यू, आय हॅवंट सीन यू हियर? हे ऐकताच रुबी तावातावाने तिच्यावर तुटून पडली आणि म्हणाली, हू आर यू? आय हॅवंट सीन यू इन द अकॅडमी? नेव्हर, टेल मी हू आर यू? हे ऐकताच ती प्रशिक्षणार्थीच नव्हे, तर अन्य प्रशिक्षणार्थी आयएएसही संभ्रमात पडले. ती मुळातच विशेष होती म्हणून अशी स्थिती निर्माण झाली.

एका प्रशिक्षणार्थीने तिच्याबाबत सांगितले की, ज्याप्रमाणे स्पेशल २६ मध्ये अक्षय कुमार शेवटपर्यंत बनावट होण्याचे गुपित उघड करत नाही, त्याचप्रमाणे तिने कधीही आपण बनावट असल्याची जाणीव होऊ दिली नाही. मात्र, एवढ्या मोठ्या संस्थेत बड्या अधिकार्‍याची धूळ फेक करत कोणी कसे अकादमीत प्रवेश करू शकतो, हा प्रश्न उरतोच.
या प्रकरणात आतापर्यंत पोलिसांच्या हवाल्यानेच बातम्या छापण्यात आल्या आहेत. अकादमीच्या कोणत्याही अधिकार्‍यापर्यंत प्रसारमाध्यमे पोहोचू शकली नाहीत. बर्‍याच प्रयत्नांनंतर "भास्कर' अकादमीतील अधिकारी आणि काही प्रशिक्षणार्थींशी बोलण्यात यशस्वी ठरले. चर्चेमध्ये बरीच धक्कादायक माहिती समोर आली. अकादमीमध्ये प्रवेशाचे दोन मार्ग आहेत. एक, मुख्य प्रवेशद्वार जिथे आयटीबीपीची सुरक्षा असते.

दुसर्‍या गेटवर सुरक्षा रक्षक तैनात असतात. रुबी मुख्य प्रवेशद्वारातून कधीही येत नव्हती. ती दुसर्‍या गेटने येत होती. उत्तराखंडचे डीजीपी बी. एस. संधू म्हणाले, रुबी नैनीतालमध्ये दीड महिन्यापर्यंत एसडीओ होऊन थांबली. ज्या हॉटेलमध्ये ती थांबे तिथे ती एटीएस नैनीतालला जात असल्याचे सांगत होती. मात्र, अनेक प्रयत्नांनंतरही ती इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश घेऊ शकली नाही. तिथे तिला कोणताच मेळ बसला नाही. ती वारंवार हॉटेल बदलत राहिली. यानंतर ती एलबीएस अकादमीत आली आणि प्रवेश मिळवण्यात यशस्वी ठरली. सर्वांत आधी तिने एलबीएस अकादमीच्या सर्वात विश्वासू देवसिंगला लायब्ररी पॉइंटवर पकडले आणि त्याच्याकडे पेइंग गेस्टचा प्रस्ताव ठेवला. यानंतर ती देवसिंगच्या घरी किरायाने राहू लागली. ती खरेच प्रशिक्षणार्थी आयएएस असल्याचे दाखवले आणि अकादमीत प्रवेश मिळवला. विशेष म्हणजे रुबीसारखे प्रकरण दर दोन वर्षांनी समोर येत असल्याचे कळाले. तीन वर्षांपूर्वी एक तरुण तर डीओपीटी आणि यूपीएस्सीची बनावट कागदपत्रे तयार करण्यासाठी आला होता. त्याला बळजबरीने बाहेर काढले तेव्हा त्याने दस्तऐवज सादर केले. एक अधिकारी म्हणाला, रुबीचे ओळखपत्र तयार झाले नव्हते. ती जे कार्ड दाखवत होती, ते एटीआय नैनीतालचे आहे. २० लाख रुपयांच्या आरोपाबाबत त्यांनी पोलिस याची चौकशी करत असल्याचे सांगितले.

या प्रकरणात अकादमीचे एक अधिकारी सौरभ जैन यांचे नाव समोर आले आहे. सौरभ जैनने रुबीला लायब्ररीमध्ये नोकरीची लालूच दाखवली होती काय? याबाबत अधिकारी म्हणाले, रुबीजवळ ग्रंथालय विषयाची पात्रता होती? सौरभ जैन अशा गोष्टी का करेल? त्याला जसप्रीत तलवारच्या जागी सीनियर डेप्युटी डायरेक्टर केले जाईल. जसप्रीत ९५ बॅचची आयएएस आहे. त्यांच्या जागी कोणी ज्युनियर आयएएस नियुक्त केला जाऊ शकत नाही. फाउंडेशन कोर्सचे सहसमन्वय असल्यामुळे सौरभ जैनच्या नावाची मदत घेण्यात आली. आम्ही सौरभ जैनशी चर्चा केली तेव्हा त्यांनी रुबी चौधरीचे आरोप बिनबुडाचे असल्याचे सांगितले. मी तर तिचा चेहराही नीट पाहिला नाही.

एका सुरक्षा रक्षकाने गैरव्यवहार केल्याची तक्रार घेऊन आली होती, तेव्हा मी तिला पहिल्यांदा २३ मार्च रोजी पाहिले होते. त्या वेळी ती प्रशिक्षणार्थी आहे की नाही हे माहीत नव्हते. पोलिस महासंचालक संधू यांच्या म्हणण्यानुसार रुबीला अकादमीत आतून पाठिंबा होता. तिला भेटण्यासाठी लोक येत तसेच ती स्वत:ला प्रशिक्षणार्थी आयएएस असल्याचे सांगत होती, हे दस्तऐवजात दिसून आले आहे. सौरभ जैनच्या कॉल डिटेल्सची माहिती घेतली जात आहे. रुबीजवळील ग्रंथालयाची पुस्तके जप्त करण्यात आली आहेत. ती केवळ रीडिंग रूममध्ये जात होती. रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडी सिस्टिम असल्यामुळे लायब्ररीतून पुस्तके घेऊ शकत नव्हती, असे असताना तिच्याकडे पुस्तक कसे आले, हा संशोधनाचा विषय आहे.

कुटुंबालाही दिली खोटी माहिती
रुबीने आई-वडिलांना अंधारात ठेवले. एसडीएम झाल्याचे व नंतर आयएएस झाल्याचे तिने सांगितले. मुजफ्फरनगरमध्ये वडील सत्यवीरसिंह खाली मान घालून बोलले, आईचे डोळे पाणावले होते. कर्ज काढून ते तिला शिकवत होते. बातमी आल्यानंतर गावकर्‍यांनी रुबीला कार भेट देऊन प्रशिक्षणासाठी मसुरीला पाठवले होते. रुबी दहावीत शाहपुराच्या आर्य अकॅडमीत होती, तेव्हा नव्या विद्यार्थ्यांना मी शिक्षिका असल्याचे सांगत भीती दाखवत होती.

श्रीमंताशी केला विवाह
रुबीचा बोलबाला झाल्यानंतर नोएडाचे शेतकरी वीरेंद्रसिंह मलिक यांच्याशी तिची मैत्री झाली. या वर्षी ३० जानेवारी रोजी दोघांचे लग्न झाले. आता पती घटस्फोट मागत असल्याने आई-वडील चिंतेत आहेत.

सरप्राइज देताना चोरी पकडली
१५ मार्च रोजी रुबीचा पती वीरेंद्र आणि भाऊ मोहित सरप्राइज देण्यासाठी अकादमीत गेले. फोनवर तिने फेज वनचा क्लास असल्याचे सांगितले. पाच वाजता तिने पोलो ग्राउंडवर जायचे असल्याचे सांगून शनिवार, रविवारीच भेटा असे सांगितले. पती व भावाने सखोल चौकशी केल्यानंतर तिची चोरी उघडकीस आली.

एवढे प्रकरण होऊनही...
भास्करचे प्रतिनिधी अकादमीत असताना रुबीला चौकशीसाठी तेथे आणले गेले. या वेळी रुबी म्हणाली, हे सगळे एकच आहेत. माझी चौकशी करता का, हिंमत असेल तर सौरभ जैनची चाैकशी करा. एकेकाला अद्दल घडवेन. या पोलिसांचीही वर्दी उतरवेन.