Home | Divya Marathi Special | fanicular train in gujrat

गुजरातेत पहिली फनिक्युलर ट्रेन

गौतम पुरोहित (गुजरात) | Update - Jun 03, 2011, 06:00 PM IST

गुजरातमध्ये सापुतारा आणि चोटिलादरम्यान देशातली पहिली फनिक्युलर ट्रेन धावणार आहे.

  • fanicular train in gujrat

    गुजरातमध्ये सापुतारा आणि चोटिलादरम्यान देशातली पहिली फनिक्युलर ट्रेन धावणार आहे. गुजरात सरकारने नुकताच हा निर्णय घेतला आहे. सापुतारा पर्वतीय पर्यटन स्थळ आहे, तर चोटिला हे तीर्थक्षेत्र आहे. या दोन स्थळांमध्ये उच्च चढ-उतारावर ही ट्रेन चालणार आहे.

    या योजनेसाठी लवकरच निविदा मागवण्यात येणार आहेत. गुजरात पर्यटन निगमच्या गुजटोप कंपनीला हा प्रोजेक्ट सोपवण्यात आला आहे. या प्रोजेक्टला पलिक प्रायव्हेट पार्टनरशिपच्या आधारावर विकसित करण्याची परवानगी देण्यात आली आहे. गुजरातचे पर्यटनमंत्री जयनारायण यांनी सांगितले की, योजनेअंतर्गत चोटिलामध्ये २५ मीटर तसेच सापुतारामध्ये ३४ मीटरचा ट्रॅक बनवला जाणार आहे. यासाठीचे सर्वेक्षणही पूर्ण झाले आहे.
    उंच चढ ङ्क्षकवा उतारावर चालणा:या रेल्वेला फनिक्युलर ट्रेन असे म्हटले जाते. रोप-वेच्या तुलनेत ही फनिक्युलर ट्रेन अधिक सुरक्षित मानली जाते. रेल्वेत एका वेळी १पेक्षा अधिक लोक प्रवास करू शकतात.

Trending