आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मो. हमीद अन्सारी: माजी उपराष्ट्रपती, तीन विषयांत डॉक्टरेट; नेहमी राहिले वादात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हमीद अन्सारींचा जन्म कोलकात्याचा. उत्तर प्रदेशच्या गाझीपूरशी संबंधित अन्सारींचा जन्म काँग्रेसशी संबंधित घराण्यात झाला. त्यांचे आजोबा डॉ. मुख्तार अहमद अन्सारी काँग्रेसचे अध्यक्ष होते. हमीद यांचे चुलतभाऊ अफझल अन्सारी उत्तर प्रदेशच्या कौमी एकता दलाचे नेते आहेत. कुख्यात डॉन मुख्तार अन्सारीही हमीद यांचे चुलतभाऊ आहेत.  
 
एम.ए.नंतर त्यांनी सिमल्याच्या सेंट एडवर्ड््स आणि कोलकात्याच्या सेंट झेवियर्स कॉलेजमधून डबल डॉक्टरेट केली. त्यानंतर अलिगड मुस्लिम विद्यापीठातूनही पीएचडी केली. ते याच विद्यापीठाचे कुलगुरूही होते. हमीद कॉलेजच्या क्रिकेट संघात यष्टिरक्षक होते. नंतर त्यांना गोल्फ आवडायला लागला. अनेक देशांत राजदूत राहिलेले हमीद उपराष्ट्रपती झाले तेव्हा अनेक वादांतही अडकले.  २०१५ मध्ये प्रजासत्ताकदिनी राष्ट्रगीताच्या वेळी त्यांनी राष्ट्रध्वजाला सलामी न दिल्यावरून वाद झाला. नंतर राष्ट्रपतींच्या उपस्थितीत उपराष्ट्रपतींना सावधान अवस्थेतच राहावे लागते, असे स्पष्ट करण्यात आले. ३० डिसेंबर २०१२ ला संसद अधिवेशनात जनलोकपाल विधेयकावर हमीद यांनी काँग्रेसला वाचवले तेव्हा सर्वात मोठा वाद झाला. मध्यरात्री राज्यसभेत येऊन त्यांनी कार्यवाही स्थगित केली होती. या निर्णयावर कडक टीका झाली होती.  
 
जन्म : १ एप्रिल १९३७.  
कुटुंबीय : पत्नी सलमा, दोन मुले, एक मुलगी.  
शिक्षण : राज्यशास्त्रात एम. ए., जामिया मिलिया, तीन डॉक्टरेट डिग्री.
चर्चेत का? - देशात एका समुदायाला सुरक्षित वाटत नाही, असे त्यांनी अलीकडेच म्हटले होते. 
बातम्या आणखी आहेत...