आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

24 मुलांचे वडील ‘पापा रेजी’

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हे आहेत  राजीव थॉमस, त्यांच्यासोबत २४ मुले आहेत. दोन त्यांची आणि इतर २२ एचआयव्ही पॉझिटिव्ह. या मुलांना पालक नाहीत. ते राजीव यांना ‘पापा रेजी’ असे संबोधतात.
 
एक दशकाआधीची ही घटना. मुंबईतील राजीव एका रुग्णालयाबाहेरून जात होते. त्यावेळी एक मुलगी भुकेने व्याकूळ असलेली त्यांना दिसली. तिची हाडं दिसत होती. राजीव यांनी तिला ‘काही खायचे का?’ असे विचारले. ती उत्तरली, ‘नूडल्स’. दुसऱ्या दिवशी राजीव नूडल्स घेऊन पोहोचले तेव्हा त्यांना तिच्या मृत्यूचीच बातमी कळाली. ती एचआयव्ही पॉझिटिव्ह होती. राजीव यांनी पत्नीशी चर्चा केली. त्यांनी दोन मुले घरी आणली. आता लोकांच्या पाठबळावर ते आज २४ मुलांसोबत राहतात.
बातम्या आणखी आहेत...