आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संशोधन: लहानपणी आजोबांसोबत नटबोल्टातून उपकरण निर्मिती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आयपॉड आणि आयफोन यांची निर्मिती केवळ स्टीव्ह जॉब्ज यांनी केली होती, अशी तुमची धारणा असेल तर ती चुकीची आहे. कारण वास्तवात त्याचे मूळ संशोधक टोनी फेडल होते. अॅपलचे माजी हार्डवेअर इंजिनिअर जॉन रुबिन्सटन यांच्यासोबत त्यांनी याची निर्मिती केली होती. टोनी २००६ मध्ये आयपॉड डिव्हिजनचे प्रमुख होते. जॉब्ज यांनी आयपॉड एमपीथ्रीपेक्षाही जास्त प्रसिद्धीस अाणला. फेडल यांनी आणलेले बिझनेस मॉडेल बाजारात पोहोचले.
अॅपलपासून विभक्त होत फेडल यांनी नेस्ट कंपनीची स्थापना केली. गुगलने ही कंपनी ३.२ अब्ज डॉलरमध्ये खरेदी केली आहे. अॅपलच्या आधी ते फिलिप्स इलेक्ट्रॉनिक्सच्या मोबाइल कॉम्प्युटिंग ग्रुपमध्ये होते. त्यांच्या नावावर ३०० पेटंट आहेत. मात्र, या लेबनीज-अमेरिकन कॉम्प्युटर सायन्स अभियंत्याला खरी ओळख आयपॉड विभागाचे सीनियर व्हाइस प्रेसिडेंट म्हणूनच मिळाली. ते अॅपलचे सर्वात यशस्वी एक्झिक्युटिव्ह मानले जातात. त्यांना अॅपल सोडल्यानंतरही यश मिळत गेले. अन्यथा त्यांना मोबाइल डिव्हाइस तयार करण्यासाठी पैसा जमा करता आला नसता. टोनी यांना पुढील स्टीव्ह जॉब्ज मानले जाते. अॅपल सोडण्याआधी ते भावी सीईओ असतील, अशी चर्चा होती.
मिशिगनमध्ये जन्मलेल्या टोनी यांना वडिलांच्या नोकरीमुळे ठिकठिकाणी राहावे लागले. टोनी यांनी १५ वर्षांत १२ शाळा बदलल्या. वडील जीन्स कंपनी लिवाइसमध्ये सेल्स एक्झिक्युटिव्ह होते. टोनींचे आजोबा शाळेचे अध्यक्ष होते. ते घरी आणि शेजारी छोटे-मोठे दुरुस्तीचे काम करत होते. यातून त्यांच्या संशोधनाला चालना मिळाली. त्यांच्याजवळ नट-बोल्ट, वायरचा मोठा साठा होता. टोनी आणि आजोबा यातून विविध वस्तू बनवत होते.
टोनी अल्पावधीतच अॅपलमधील महत्त्वपूर्ण व्यक्ती ठरले. जॉब्ज आणि फेडल यांच्यात पिता-पुत्र, शिक्षक-विद्यार्थी असे नाते होते. टोनी आणि पत्नी डॅनियलची पहिली भेट अॅपल मुख्यालयात झाली. लग्नाच्या दुसऱ्या दिवशी दोघांनी अॅपलच्या नोकरीचा राजीनामा दिला. दोघे मुलांसोबत पॅरिसला गेले. एका लग्नासाठी अमेरिकेला आले तेव्हा अॅपलचा जुना सहकारी त्यांना भेटला. नंतर त्याच्यासोबतच नेस्ट कंपनी स्थापन केली.