आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

न रंगलेले युद्ध : ‘वॉर छोड ना यार’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सीमेवरच्या भीषण वास्तवाची टर उडवणारा, तरीही संदेश देऊन जाणारा ‘वॉर छोड ना यार’ हा चित्रपट आहे. भारत-पाकिस्तान यांच्या धगधगत्या सीमा आणि युद्धासाठी दोन्ही देशांना भडकवणारे अमेरिका-चीन या बाबींचा वापर करत चित्रपटाची कथा गुंफण्यात आली आहे. शर्मन जोशी, संजय मिश्रा, जावेद जाफरीसारखे कलावंतांना घेऊन दिग्दर्शक फराज हैदरने ही विनोदाची भट्टी जमवली. मात्र, मूळ कथेला पकड नसल्याने देशाच्या सीमेवरील 17 तासांची कहाणी सांगणारा हा चित्रपट शेवटपर्यंत प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यात अयशस्वी ठरतो. यामध्ये चायना मेड वस्तूचा वापर कसा घातक आहे, यावर विनोदी अंगाने भाष्य करण्यात आले असून भारताच्या या शत्रू राष्‍ट्राच्या उत्पादनांचा वापर टाळावा, असा संदेशही चित्रपटातून देण्यात आला आहे.


कथा :
भारतीय सीमेवरील कॅप्टन राजसिंग राणा (शर्मन जोशी) आणि पाकिस्तानच्या सीमेवरील कप्तान कुरेशी (जावेद जाफरी) या दोघांत मैत्री. त्यांच्यांत हास्यविनोद, अंताक्षरी, पत्त्यांचा खेळ सातत्याने रंगतो. एका वृत्तवाहिनीची पत्रकार रूद दत्ता (सोहा अली खान) सीमेवरील गांभीर्य टिपण्यासाठी संरक्षणमंत्र्याच्या (दिलीप ताहिल) सांगण्यावरून निघते.


मात्र, प्रत्यक्ष स्थिती पाहिल्यानंतर राजकारणी कशा पद्धतीने स्वत:चा आर्थिक स्वार्थ साधण्यासाठी अशा प्रकारचे खेळ खेळून युद्धाची स्थिती घडवून आणतात, हे वास्तव तिच्यापुढे येते. आपल्या चॅनलच्या माध्यमातून राजकारण्यांचा पर्दाफाश करत ती युद्ध थांबवते. दरम्यानच्या काळात शर्मन आणि सोहा यांच्यातील प्रेम फुलते. मात्र पडद्यावर सोहा आणि शर्मन यांची प्रेमकहाणी फारसी रंगत नाही.


संवाद :
चित्रपटांतील सर्वच संवाद अतिशय हलकेफुलके आहेत. सहज-सुंदर विनोद मांडण्यात लेखकाला यश आले आहे. युद्धाचे गांभीर्य कुठेच दिसून येत नाही. जावेद जाफरी, शर्मन जोशी आणि दीपक मिश्रा यांनी विनोदाचे आपले स्किल अचूक सांभाळत केलेली संवादफेक मात्र संवादाला फारशी तारू शकली नाही.


संगीत :
चित्रपटाचे संगीत फारसे मनाला भावणारे नाही. नायक-नायिका किंवा इतर कुणाच्याही तोंडी गाणी देण्यात आली नसून प्रत्येक गाणे बॅकग्राउंडला चित्रित करण्यात आले आहे.


अभिनय :
शर्मन जोशी, संजय मिश्रा आणि जावेद जाफरी यांनी विनोदाला शोभणारा उत्तम अभिनय केला आहे. प्रत्येक संवाद फेकण्यातून प्रेक्षकांना हसवण्याचा त्यांनी प्रयत्न केला.
कारगिल युद्धाच्या वेळी प्रत्यक्ष युद्धभूमीवर जाऊन वृत्तांकन केलेल्या बरखा दत्त यांच्याप्रमाणे वृत्तवाहिनीची पत्रकार म्हणून सोहाने उभी केलेली पत्रकार फारसी मनाला भिडत नाही. मुकुल देवने साकारलेला अफगाणी घुसखोरही यथातथाच म्हणावा लागेल.
दर्जा : *