आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वसतिगृहात पहिल्या ड्रोनची निर्मिती आज ७०% बाजारावर अधिराज्य

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फ्रँक वांग संस्थापक आणि सीईआे, डीजेआय टेक्नॉलॉजी   जगातील सर्वात मोठी खासगी ड्रोन कंपनी - Divya Marathi
फ्रँक वांग संस्थापक आणि सीईआे, डीजेआय टेक्नॉलॉजी जगातील सर्वात मोठी खासगी ड्रोन कंपनी
फ्रँक वांग हे डाजिआंग इनोव्हेशन टेक्नॉलॉजी (डीजेआय) कंपनीचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. ही जगातील सर्वात मोठी खासगी ड्रोन कंपनी आहे. गुंतवणूकदारांनी ही ८ अब्ज डॉलर्सची कंपनी असल्याचा अंदाज वर्तवला आहे. फोर्ब्जच्या अंदाजानुसार वांग यांची यात ४५% भागीदारी आहे. २००६ मध्ये ही कंपनी सुरू केली होती. फँटम ड्रोन हे कंपनीचे लोकप्रिय उत्पादन आहे.

डीजेआयचे ड्रोन नेहमी चर्चेत असतात. वांग यांची निर्मिती असलेल्या ड्रोनने अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे निवास असलेल्या व्हाइट हाऊस लॉन्सवर अचानक लँडिंग केले होते. तर अणुप्रकल्पाला विरोध दर्शवण्यासाठी कुणीतरी जपानच्या पंतप्रधान कार्यालयावर किरणोत्सर्जन करणाऱ्या कचऱ्याची बाटली ड्रोनद्वारे उतरवली. असा नकारात्मक प्रचार होत असूनही वांग यांना ही फारशी मोठी समस्या अाहे असे वाटत नाही. कारण जगातील एकूण ड्रोन बाजारापैकी ७०% बाजारावर वांगच्या कंपनीचा कब्जा आहे. या ड्रोनचा उपयोग हॉलीवूडच्या स्टारवॉर्स आणि गेम ऑफ थ्रोनसारख्या चित्रपटांतून झाला आहे.
१९८० मध्ये चीनच्या हाँग्जो येथे वांगचा जन्म झाला. वडील अभियंता व आई शिक्षिका. त्यांना लहानपणी रेड हेलिकॉप्टर नामक साहसी कथांचे कॉमिक्स फार आवडत असे. त्यामुळे उड्डाणाचे प्रचंड आकर्षण त्यांना होते. एमआयटी किंवा स्टॅनफोर्ड विद्यापीठात प्रवेश मिळवण्याची इच्छा होती. मात्र गुणपत्रिका तितकी पात्र नव्हती. मग त्यांनी हाँगकाँग विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्यापीठात प्रवेश घेतला. येथे इलेक्ट्रॉनिक अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले. अंतिम वर्षात त्यांनी हेलिकॉप्टर फ्लाइट कंट्रोल सिस्टिमची निर्मिती केली. याच्या प्रेझेंटेशनच्या वेळीच कॉम्प्युटर प्रणाली बंद पडली. त्यामुळे त्यांचे काम सिद्ध होऊ शकले नाही. त्यांचे प्रोफेसर ली शियांग यांनी वांगच्या संकल्पनेची दखल घेतली हे त्यात महत्त्वाचे. त्यांनी पदवी शिक्षणासाठी त्यांना प्रवेश दिला. पहिला ड्रोन वसतिगृहाच्या खोलीत तयार केला.

उत्पादनाचे केंद्र असलेल्या शेन्जेन येथे तीन बेडरूमच्या अपार्टमेंटमध्ये त्यांनी काम सुरू केले. विद्यापीठाच्या विद्यावेतनातून पैशांची बचत करून त्यांनी सुरुवातीचा खर्च चालवला. विद्यापीठ व सरकारी ऊर्जा निर्मिती कंपनीसाठी त्यांनी ६००० ड्रोन्सची निर्मिती केली. अशा रीतीने १०-१५ लोकांच्या स्टाफचा खर्च निघू लागला. त्या वेळी ड्रोन बनवणे हेच उद्दिष्ट होते असे ते सांगतात. त्यामुळे सगळ्यांचा खर्च भागत असे. कंपनी सुरू केल्यानंतर दोन वर्षांतच सर्व सहकारी सोडून गेले. आपण परफेक्शनिस्ट असल्याने असे झाले असावे, असे वांग सांगतात. त्यांना जर्मनी आणि न्यूझीलंडसारख्या देशातून मेल येऊ लागले. आवड म्हणून लोक ड्रोनची मागणी करत.

डीजेआयने ऑटोपायलट मोडसहित अधिक प्रगत ड्रोन विकसित केले. याचे निर्मिती मूल्यही कमी होत गेले. ड्रोनची समज असणाऱ्यांना त्यांनी परदेशात ड्रोन विकणे सुरू केले. त्या वेळी अमेरिकेत त्रिमितीय रोबोटिक्स कंपनीची स्थापना झाली. वांग यांनी सर्व प्रतिस्पर्धी आणि आव्हानांना मागे सारले. त्यांच्यावर स्टीव्ह जॉब्जचा प्रभाव आहे. प्रतिस्पर्ध्यांवर मात करण्यासाठी व यशासाठी तुम्हाला चमकदार कामगिरीची गरज असते, असे वांग सांगतात. वांग इतरांसोबत आपल्या भविष्यातील प्रकल्पांवर चर्चा करू इच्छित नाहीत. त्यांच्या ड्रोन्सचा कमाल व्यावसायिक उपयोग होण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. कृषी, बांधकाम, मॅपिंगसाठी ते प्रामुख्याने उत्पादन करतात. या क्षेत्राची व्याप्ती कमी असून अद्याप ते समाधानी नाहीत.
बातम्या आणखी आहेत...