रांची - महेंद्रसिंह धोनी सध्या कन्या जीवाला पूर्णवेळ देत आहे. कुठेही गेला तरी जीवा त्याच्यासोबत असतेच. आधी कोलकात्यात व आता चेन्नईतही. जीवाचा जन्म ६ फेब्रुवारीचा, पण धोनी तिला ५१ दिवसांनंतर म्हणजे २८ मार्चला भेटला. जीवाचा जन्म ६ फेब्रुवारीचा, पण धोनी तिला ५१ दिवसांनंतर म्हणजे २८ मार्चला भेटला. धोनी माध्यमांशी फारच कमी वेळा बोलतो. घरी परतल्यानंतर त्याने ‘भास्कर समुहाशी संवाद साधला. वाचा चर्चेतील प्रमुख मुद्दे....
प्रश्न : आपल्या बाळाला आपण सर्वांत आधी कुशीत घ्यावे, असे प्रत्येकाला वाटते. पण तू ५१ दिवसांनंतर मुलीला भेटलास...
धोनी : ‘हे पाहा, जेव्हा मोठे ध्येय असते तेव्हा समर्पणही मोठेच असावे लागते. घर-कुटुंब गौण ठरते. मीही तेच केले.’
प्रश्न : कसोटी आणि तिरंगी मालिकेत मोठे अपयश मिळाले. तरीही तू संघाला सांभाळून घेतले, ते कसे?
धोनी : मी अपयशापासून धडा घेतो. कधीही तणावात खेळत नाही. पराभवानंतर तणावात खेळलात तर तुमचे आणि कर्णधार म्हणून संघाचेही मोठे नुकसान होते. अनेकदा असे घडले आहे. आता मी डगमगत नाही. माझ्या या दृष्टिकोनाची जाणीव सर्वांना आहे. आता त्यांनीही माझ्यासारखाच विचार आणि कृती करण्यास सुरुवात केली आहे.
पुढील स्लाइडवर वाचा, धोनीला विचारलेले इतर प्रश्न व त्याने दिलेली उत्तरे...