आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पहिल्या प्रेमिकेची केली त्याने गोळ्या घालून हत्या

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या वर्षी एका कार्यक्रमात किम आणि ह्योन एकत्रित दिसून आले.
ह्योन सोंग वोल, कदाचित हे नाव कोणालाही माहिती नसेल. पण ती उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन यांची पूर्वीची प्रेमिका होती, असे सांगितले तर कदाचित ओळखू शकाल. अश्लील चित्रपटांमध्ये काम केल्यामुळे नाराज असलेल्या किम यांनी त्यांची ही प्रेमिका आणि तिच्या 11 सहकार्‍यांना 20 ऑगस्टला सर्वांसमोर गोळ्या घालण्याचे आदेश दिले व त्यांच्या कुटुंबीयांसमोर त्यांची गोळ्यांनी चाळणी करून टाकली. सेन्सॉरमुळे ही बातमी काही दिवसांनंतर मीडियाच्या समोर येण्यास सुरुवात झाली. किम व ह्योन एकमेकांना 16 व्या वर्षापासून ओळखत होते. 4 जानेवारी 1984 ला जन्मलेले जोंग सन 2000 मध्ये स्वित्झरलँडमधून शिक्षण घेऊन उत्तर कोरियात परतले तेव्हा त्यांच्यामध्ये प्रेमसंबंध सुरू झाले; पण हे खूप दिवस चालले नाही. किमचे वडील किम जोंग इल यांना ते आवडले नाही. त्यांचे प्रेम अधुरेच राहिले व तिने एका सैनिकाशी लग्न केले. इकडे किम यांचे लग्न री सोल जू यांच्यासोबत झाले.

विशेष म्हणजे ज्या बँडसाठी ह्योन काम करत होती त्याच बँडमध्ये किम जोंग उन यांची पत्नी रीदेखील होती. ह्योन उत्तर कोरियाची पॉप गायिका होती. उत्तर कोरियात त्यांचा बँड खूप लोकप्रिय होता. ह्योनने 2005 मध्ये गायलेल्या गाण्याने तुफान लोकप्रियता मिळवली होती. 2006 मध्ये ती अचानक गायब झाली. जपानी मीडियाने सांगितले की, सैनिकासोबत लग्न केल्यानंतर ती एका मुलाची आई बनली. मागील वर्षी मार्च महिन्यात ह्योन सहा वर्षांनंतर पहिल्यांदाच सार्वजनिकरीत्या दिसली. तेव्हा किमच्या वडिलांचे निधन झाले होते. आंतरराष्ट्रीय महिला दिवसावर प्योंगयांगमध्ये आयोजित एका कार्यक्रमात तिने गाणे गायले होते; परंतु उत्तर कोरिया स्टेट टीव्ही तेव्हा तिला ओळखू शकले नाही. परंतु, दक्षिण कोरियातील गुप्तचरांनी ह्योनला ओळखले होते.