आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Five Reasons Behind Shiv Sena Leader Suresh Prabhu Selection For Cabinet

ANALYSIS: या 5 कारणांमुळे सेनेच्या सुरेश प्रभू यांची मोदींच्या कॅबिनेटमध्ये वर्णी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
व्यवसायाने चार्टड अकाऊटंट आणि शिवसेनेचे खासदार सुरेश प्रभू यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कॅबिनेटमध्ये वर्णी लागली आहे. वाजपेयी सरकारमध्ये अनेक मंत्रीपदे भुषविलेले प्रभू यांना रेल्वे मंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. केवळ मोदी यांनी निवड केल्याने सुरेश प्रभू यांचा कॅबिनेटमध्ये समावेश करण्यात आला आहे. पण मोदींनी त्यांच्यावर एवढा विश्वास दाखवला कसा, प्रभू यांच्या क्षमतेवर मोदींचा एवढा विश्वास कसा आदी प्रश्न अद्यापही अनुत्तरीत राहिले आहेत. त्यामुळे आम्ही त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केलाय...
अटल बिहारी वाजपेयी सरकारमध्ये सुरेश प्रभू यांनी उद्योग, पर्यावरण आणि वन, खते आणि रसायने, ऊर्जा, अवजड उद्योग आणि पब्लिक एन्टरप्रायजेस या जबाबदाऱ्या यशस्वीपणे पेलल्या. परंतु, भाजपचे केंद्रातील सरकार गेल्यावर सुरेश प्रभू काहीसे चर्चेबाहेर राहिले. राजापूर मतदार संघातून ते तब्बल चार वेळा लोकसभेवर निवडून गेले. पण 2009 मध्ये त्यांचा येथून पराभव झाला. गेल्या लोकसभा निवडणुकीत ते पुन्हा निवडून आले. त्यानंतरही ते शिवसेनेच्या सक्रिय राजकारणाबाहेर होते. तरीही नरेंद्र मोदी यांनी त्यांची ऊर्जा खात्याच्या एक वरिष्ठ समितीच्या अध्यक्षपदी निवड केली होती.
पुढील स्लाईडवर जाणून घ्या, का झाली सुरेश प्रभू यांची कॅबिनेटसाठी निवड... नरेंद्र मोदी यांनी त्यांच्यावर का दाखवला एवढा विश्वास...