आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Five Thinks Of Small Mistake,Latest News Divya Marathi

छोट्या-छोट्या चुकांपासून सुटका करून घेण्याचे पाच उपाय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जीवनात काहीही घडले तरी आपले लक्ष्य निश्चित ठेवा. तसेच सर्वोत्तम प्रयत्न करा. आव्हानांचा सामना केला नाही तर जीवनाचा आनंद उपभोगता येणार नाही. जेव्हा काही चुका होतात तेव्हा त्यांची जबाबदारी दुस-यांवर टाकणे सोडून द्या. अशा वेळी स्वत:लाच विचारा की, मी यातून काय शिकू शकतो? आणि पुढचे कोणते सर्वात चांगले पाऊल असेल, जे मी आता उचलू शकतो. स्वत:चा शोध घेतल्यास स्वतंत्र आणि मोठी शक्ती दिसेल. आपले विचार आणि वर्तणूक आपल्या सत्याला आकार देतात.
अडचणी संपवण्यासाठी रचनात्मक विचार करा
आपण आपल्या जीवनात खूप काही नियंत्रित करू शकतो; परंतु अनेक गोष्टी नियंत्रणाबाहेर असतात. या अडचणी रचनात्मक कार्यासाठी प्रेरित करतात. बिल देण्यासाठी पैशांची गरज असते, ही अडचण आहे; परंतु पैसे कमावण्याच्या रचनात्मक कार्यामुळे ती दूर होते. आपण जो मार्ग निवडला आहे, त्यामुळे पूर्णत: आनंदी असाल तर त्या गोष्टींचा विचार करणार नाही, ज्या तुमच्या नियंत्रणात नाहीत. स्वत:च्या यशाची व्याख्या करा. दुस-या व्यक्तींच्या बेंचमार्कने स्वत:चे यश मोजू नका. जीवनात काय करायचे, याची निवड स्वत: करा. जगात सात अब्ज व्यक्ती आहेत; पण सर्व एकसारखे जीवन जगत नाहीत. त्यासाठी अंतर्मनाचा आवाज ऐका.
काय हवे, काय नको हे नेहमी निश्चित असावे
आपल्यासाठी स्वीकारार्ह काय आहे व काय नाही, याचे उदाहरण इतरांपुढे मांडा. एक यशस्वी व्यक्ती तीच असेल, जिला माहिती असेल की, आपल्याला काय नको आहे व कोणती गोष्ट आपण सहन करू शकत नाही. तसेच तुम्हाला जे करायचे असेल त्याबाबत स्पष्ट भूमिका असावी. तुम्हाला कसे वातावरण हवे? कोणती माहिती घेणे आवडेल? त्यामुळे स्वत:साठी मानक तयार करा आणि ते लागू करा. स्वत:वरील प्रेम आणि सन्मानास कोणत्याही चुकीच्या गोष्टीमुळे ठेच पोहोचायला नको, हेही पाहा.
यश मिलवून देतील अशा व्यक्तींची मदत घ्या
जीवन फक्त एक प्रयोग, एक अनुभव आहे; परंतु त्यासंदर्भात खूप गंभीर असण्याची गरज नाही. लक्ष्य अधिक गंभीरपणे घेतल्यास त्याच्या यशाचा जो आनंद आहे तो मिळणार नाही. त्यामुळे सामान्यपणे जीवन जगा व उदारतेवर प्रेम करा. स्वत:ला व्यक्तिगत स्वातंत्र्य व सुरक्षा खूप महत्त्वाची आहे. जीवनाच्या जहाजाचे तुम्ही एकटे कॅप्टन आहात, समुद्राचे नाही. त्यामुळे अशा व्यक्तींची मदत घ्या, ज्या तुम्हाला यशस्वी करण्यासाठी मदत करतील. एकटे राहून यश मिळवणे अशक्य आहे. त्यामुळे आपल्या जवळपास चांगल्या व्यक्तींची निवड करा, ज्या तुमचे मूल्य समजू शकतील व त्यांचे आदर्श तुमच्या आदर्शांशी अनुकूल असतील.
कमिटमेंटपासून कठीण प्रसंगातही दूर जाऊ नका
अंतर्मनाचा विचार कराल तेव्हा आपल्या इच्छेनुसार जीवन जगण्याच्या मार्ग निवडणार असाल, तर तो मार्ग लहान होण्याची शक्यता असते. छोट्या मार्गात अनेक अडचणी येतात आणि या अडचणी कधी संपणार नाहीत, असे वाटायला लागते. आयुष्य नेहमी आपल्या कटीबध्दता,वजनबध्दतेची परीक्षा घेते आणि जे कठीण प्रसंगातही आपल्या वचनबद्धतेपासून दूर जात नाहीत त्यांनाच सर्वात मोठे यश मिळते. तुमच्या आत्म्याला कोणीही जिंकू शकत नाही, हे लक्षात ठेवा.