आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Flamingo Bird Found At Sakhana Dam Prisar In Aurangabad

सुखना धरणात फ्लेमिंगोंचा जलविहार; देशी-विदेशी पक्ष्यांचे प्रमाण घटले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कायगाव (औरंगाबाद) दरवर्षी हिवाळ्यात जायकवाडी, सुखना, कायगाव (टोका), सलीम अली सरोवर (हर्सूल), पिंपळवाडी, जांभूळबन, सांजूळ तलाव, दहेगाव, जायकवाडी पंपिंग स्टेशन परिसरात मोठ्या प्रमाणात देश-वि देशातील पक्षी येतात. मात्र, वाढत्या जलप्रदूषणामुळे यंदा खूप कमी प्रमाणात पक्ष्यांनी या परिसरात स्थलांतर केल्याचे रविवारी झालेल्या पक्षी गणनेदरम्यान स्पष्ट झाले.
या सर्वेक्षणादरम्यान नवनवीन पक्ष्यांचा अधिवास असल्याचे आढळल्याने पक्षिमित्रांना दिलासाही मिळाला आहे. रविवारी पहाटे सहा वाजता औरंगाबाद येथून पक्षिमित्रांचा चमू जायकवाडीच्या दिशेने रवाना झाला. दिवसभरात गंगापूर तालुक्यातील कायगाव (टोका), सांजूळ तलाव, रामडोह, जांभूळबन आदी तलावांना भेटी देत त्यांनी पाहुण्या पक्ष्यां ची नोंद घेतली; परंतु पैठणच्या जायकवाडी धरण परिसरात यंदा फ्लेमिंगो पक्षी म्हणावे तेवढे आढळून आले नाहीत.

'शेतकऱ्यांनी पिकांना आवश्यक तेवढेच पा णी द्यावे. आलटून पा लटून पिके घ्यावीत. पा णतळ वाचवण्यासाठी प्रयत्न करावे. कॅल्शियम फॉस्फेट कमी वापरावे. वन विभागाने वनक्षेत्र संरक्षित करावे. मासेमारी करू देऊ नये.'
- डॉ. किशोर पाठक, पक्षी अभ्यासक