आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वयानुसार काय खावे, जाणून घ्या

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वयानुसार शरीराची पौष्टिक पदार्थांची गरज बदलत असते. नवजात अर्भकास जन्मापासून ते 6 महिने किंवा वर्षभर आईचे दूधच पाजावे. वर्षभरानंतर दुसरे दूध आणि मऊ अन्न खाऊ घालावे. दुधामध्ये लोहाचे प्रमाण कमी असते. त्यामुळे मुलांना फळे, भाज्या आणि डाळी खाऊ घालाव्यात. यामुळे शरीराची झिंक तसेच क आणि ड जीवनसत्त्वाची गरज पूर्ण होते.
शाळेत जाणा-या मुलांना प्रथिनांची आवश्यकता असते. यामुळे शरीरास ऊर्जा मिळते. मुलांना काकडी, गाजर खाऊ घाला. दूध, दही आणि पनीरमधून कॅल्शियमची गरज पूर्ण होते. 10 ते 14 वर्षांच्या मुलांना तंतुमय अन्नपदार्थ द्यावेत. या वयात शरीराला अ जीवनसत्त्व आणि कॅल्शियमची गरज असते. मुलींना लोहाची गरज असते.

या वयात मुरमे, जेवणाच्या सवयीत बदल, वजन वाढणे यावर लक्ष ठेवा. या दिवसांत लोहयुक्त भाज्यांचे प्रमाण वाढवा. किशोरवयीन मुलांना जंकफूड आवडते, पण त्याने वजन वाढते. हार्मोन्समध्ये बदल होतात. मुलांना टाइप टू मधुमेह होऊ शकतो. मुलांना चौरस आहार उदाहरणार्थ भाजी, पोळी, वरण0भात, सॅलड असे जेवण घेण्याची सवय लावा. दूध, दही, हिरव्या पालेभाज्या, फळे आणि सुका मेवा खाण्याची त्यांना सवय लावा.

गर्भावस्थेशिवाय वयाच्या 19 ते 50 या टप्प्यात पौष्टिक घटकांची गरज बदलत नाही. सोयाबीन व जवस सेवन केल्यास रोगप्रतिकारक शक्ती वाढते. कॅल्शियम, मॅग्नेशियम व ड जीवनसत्त्वयुक्त पदार्थांचे सेवन करावे. वयोवृद्धांची जेवण न पचण्याची तक्रार असते. यासाठी तंतुमय पदार्थांचे सेवन करावे. या वयात शरीरात व्हिटॅमिन बी 6, बी 12, डी तसेच झिंक आणि प्रथिनांचे प्रमाण कमी होते. प्रतिकार क्षमता आणि स्मरणशक्ती वाढवण्यासाठी दूध-दही आणि पनीरचे सेवन करावे.

इशी खोसला : क्लिनिकल न्यूट्रिनिस्ट आणि डायरेक्टर होल फूड्स, नवी दिल्ली