भारतातील बनारस शहराचे वेगळेपण पहायचे असल्यास एकदा अवश्य या शहराला भेट द्यावी. येथील राहणीमान, खाण्या-पिण्याच्या सवयीचा आनंद खरच कायमचा स्मरणात राहण्या सारखा आहे. या शहराची झगमगाट बघून या शहराला लोक ‘सिटी ऑफ लाइट’ या नावाने देखील ओळखतात. भारतातील या धार्मिक नगरीमध्ये सकाळी-सकाळी होणारी गंगा आरती डोळ्यांचे पारणे फेडणारी असते. आरतीच्या वेळी गंगा नदीमध्ये सोडण्यात येणा-या दिव्यांमुळे अवघे बनारस प्रकाशाने उजळून निते. या अशा प्रसिद्ध शहरात गंगा नदीबरोबरच खाण्या-पिण्याचे पदार्थही विशेष प्रसिद्ध आहेत.
वाराणसीचे खान-पान
काशीमध्ये खाण्या-पिण्याची समृद्ध परंपरा आहे. येथील कचोरी- जिलेबी, चूड़ामटर, श्रीखंड आणि मलाई प्रसिद्ध आहे. येथील सर्वच पदार्थांमध्ये विविधता असल्याने येथील प्रत्येक पदार्थाला वेगळे म्हत्त्व आहे. बनारसमधील स्ट्रीट फूड देखील फेमस आहे. येथे दूधापासून तयार करण्यात आलेले भरपूर पदार्थ मिळतात. उन्हाळ्यात तुम्हाला प्रत्येक दुकानात घट्ट लस्सी मिळेल. याशिवाय टरबूज ज्युस आणि ठंडाई प्रसिद्ध आहे.