आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

AMAZING WEBSITE: मुलांमधील उत्‍सुकता आणि ज्ञान वाढवण्‍यासाठी...

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

thekidshouldseethis.com: इंटरनेट हे अनेक गोष्टींचा सागर आहे. येथे चांगल्या गोष्टीप्रमाणे वाईट गोष्टींची सुद्धा भरमार आहे. चांगले काय,वाईट काय याची जाण प्रौढ व्यक्तींना असते पण मुलांसाठी काही बाबी धोकादायक असतात. अशावेळी मुलांना चांगली माहिती पुरवण्यासाठी हे संकेतस्थळ पालकांसाठी एक पर्वणी आहे. मुलांसाठी तयार केलेली अनेक व्हिडिओ यावर उपलब्ध आहेत.

आईवडिलांच्या मदतीने मुलांना ही व्हिडिओ पाहता येतील. मुलांमधील उत्सुकता आणि ज्ञान वाढवण्यासाठी हे फायदेशीर ठरते. इंटरनेटवर हे व्हिडिओ फारसे चर्चित नसतील पण मुलांच्या संगोपनात हे नक्की मदतीचे ठरतील.या ठिकाणी असलेले व्हिडिओ महिला आणि मुले एकत्र पाहू शकतील अशी आहेत. तुमच्या मुलांना घेऊन या संकेतस्थळाला एकदा भेट देणे नक्कीच आनंददायी ठरेल.