आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

स्मरणशक्ती वाढवण्यासाठी पोषक आहार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्मरणशक्तीचे रक्षण करू शकेल असे एकही औषध नाही. पौष्टिक आहार, नियमित व्यायाम आणि आठ तास झोप घेतल्याने मेंदूच्या कार्यशक्तीत वाढ होऊ शकते. असे काही पौष्टिक घटक आहेत, ज्यांच्या सेवनाने मेंदू तल्लख होतो. या पदार्थांच्या सेवनाने वाढत्या वयासोबत स्मरणशक्ती कमी होण्याची भीती राहत नाही.


जेवणात अँटिऑक्सिडंट आणि फ्लेव्होनॉइडचे प्रमाण वाढवा. या घटकांमध्ये आजारांशी लढण्याची ताकद असते. यासाठी आहारात अ, क आणि ई जीवनसत्त्व असलेले पदार्थ उदाहरणार्थ अंडी, गाजर, ब्रोकोली, मासे, हिरव्या पालेभाज्या आणि फळांचे प्रमाण वाढवावे. यामुळे मेंदूच्या पेशींची झीज कमी होईल. शरीरात फ्लेव्होनॉइडचे प्रमाण वाढवण्यासाठी काळी द्राक्षे, कांदा, सफरचंद, ग्रीन टी, ब्लॅक टी यांचे सेवन करावे. दिवसभरातून तीन कप ग्रीन टी, तीन-चार प्रकारची फळे आणि डार्क चॉकलेटचे दोन - तीन तुकडे (दोन ते तीन ग्रॅम) सेवन केल्यास लाभ होईल.
मेंदूसाठी ओमेगा-3 फॅटी अ‍ॅसिड लाभदायक ठरते. यासाठी मासे, मोहरीचे तेल, सोयाबीन, अक्रोड, जवस या पदार्थांचे सेवन करा. जवसात ओमेगा-3 फॅटी अ‍ॅसिडचे प्रमाण सर्वाधिक असते. ब-1 जीवनसत्त्वामुळे चेतासंस्था उत्तम राहते. स्मरणशक्ती वाढते. आठवणी प्रदीर्घकाळ ताज्या राहतात. एकाग्रता वाढते.


शरीरात लोहाच्या कमतरतेचा थेट परिणाम कामगिरीवर होतो. यासाठी आहारात मांस, मासे, कडधान्ये आणि शेंगांचा समावेश करावा. शाकाहारातून मिळणा-या प्रथिनांपेक्षा प्राणिज प्रथिनांचे सेवन करावे. प्राणिज प्रथिनांमध्ये बायो-अ‍ॅव्हेलेबल लोह असते, ते शरीरासाठी लाभदायक असते. लेसिथिनमुळे मेंदूतील स्मरणशक्ती वाढवणा-या पेशींमध्ये वाढ होते. यामुळे शॉर्ट टर्म मेमरी वाढते, पण मेमरी लॉस होत नाही. शरीरात याचे प्रमाण वाढवण्यासाठी आहारात अंडी, सोयाबीन, पत्ताकोबी आदी पदार्थांचा वापर वाढवावा.
-प्रिव्हेन्शन नियतकालिकातून