Home »Divya Marathi Special» For Manarism One Cororpati Mother Becomes Cleaning Worker

संस्कारांसाठी कोट्यधीस आई बनली सफाई कामगार

दिव्य मराठी नेटवर्क | Jan 10, 2013, 00:00 AM IST

  • संस्कारांसाठी कोट्यधीस आई बनली सफाई कामगार


मुलांवर संस्कार करण्यासाठी आई-वडील त्यांना गोष्टी सांगतात किंवा आदर्श, महान लोकांची पुस्तके वाचायला देतात. मात्र, चीनमधील एका आईने आपल्या मुलासमोरच नव्हे, तर संपूर्ण जगासमोर एक आदर्श उदाहरण ठेवले आहे. मुलावर कष्ट करण्याचे संस्कार करण्यासाठी चीनमधील कोट्यधीश आई आठवड्यातून सहा दिवस रस्त्यावर सफाई कामगाराचे काम करत आहे. 53 वर्षांची यू युजहेन ही महिला चीनमधील वूहान शहरात प्रॉपर्टीचा व्यवसाय करते; पण 17 पेक्षा जास्त फ्लॅटची मालकीण असलेली ही आई ऐश्वर्यसुख घेण्याऐवजी सकाळी लवकर उठून जवळपास तीन किलोमीटरचा रस्ता साफ करते. मुलांवर संस्कार करण्यासाठी तसेच त्यांना पैशाचे महत्त्व पटवून देण्यासाठी त्यांना पार्टटाइम नोकरी करण्यासाठीही तिने प्रोत्साहन दिले आहे. तिचा मुलगा ड्रायव्हरची नोकरी करत असून 17 हजार रुपये कमावतो, तर मुलगीही 26 हजार रुपये कमावते. वू आणि तिचे पती शेतकरी होते. पूर्वी ते भाजी विकणे आणि मार्केटमध्ये ओझी वाहण्याचे काम करत असत. 1980 दरम्यान चीनमधील शेतक-या ना व्यवसायाचे स्वातंत्र्य मिळाले. तेव्हा त्यांनी खूप मेहनत करून पैसा कमावला. कष्ट अणि जिद्दीने व्यवसाय करून त्यांनी 5 मजल्यांची तीन घरे खरेदी करून भाड्याने दिली. त्यांच्या मेहनतीचे फळ म्हणूनच आज ते कोट्यधीश बनले आहेत.

onenews.com

Next Article

Recommended