आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यशस्वी होण्यासाठी तीन शैलींमध्ये संतुलन साधा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ऑफिसात वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांसोबत काम करावे लागते. त्यांच्या काम करण्याच्या पद्धतीही निरनिराळ्या असतात. बहुतेक संस्थांमध्ये लोक मुख्यत्वे तीन प्रकारे काम करतात. यापैकी कोणती एखादी पद्धती चुकीची किंवा बरोबर नाही. किंबहुना दीर्घकालीन यशासाठी या तिन्ही पद्धतींमध्ये संतुलन साधणे गरजेचे आहे.
केस-1 संजीव स्टार परफॉर्मर आहे. तो ठरवलेल्या ध्येयापेक्षा जास्त चांगली कामगिरी करतो. कित्येकदा एका वर्षात त्याला दोनदा बढतीही मिळते. पण तो एक्झिक्युटिव्हची जबाबदारी घेऊन टीमचे नेतृत्व किंवा मार्गदर्शन करण्यासाठी सक्षम आहे? संजीवचे वरिष्ठ या प्रश्नाचे उत्तर शोधत आहेत. पण का? कारण संजीवला आॅर्डर देण्याची सवय आहे. तो अनेकदा टीमला मोठ्या आवाजात वा चुकीच्या पद्धतीने बोलवतो. तो चांगला लीडर बनेल, पण त्याच्यासोबत काम करणे अवघड आहे. त्यामुळे संजीववर मोठी जबाबदारी सोपवण्याआधी त्याला प्रशिक्षण देणे गरजेचे आहे.
केस-2 संजय आपल्या वरिष्ठांचे आणि टीमचे दु:ख समजू शकतो. टीममध्ये त्याच्याविषयी चर्चा व्हावी, अशी त्याची इच्छा असते. संजय कसा परफॉर्मर आहे? चांगला पण संजीवच्या तुलनेत अंडर परफॉर्मर आहे. कारण त्याचे लक्ष व्यवसायातील ध्येयापेक्षा जास्त सामाजिक प्रतिमा बनवण्याकडे आहे. त्याला ब-या चदा आपल्या कामासाठी इतरांची मदत घ्यावी लागते.
केस-3 सुरेशमध्ये संजीव आणि संजय या दोघांचे गुण आहेत. तो आपल्या टीमला नव्या गोष्टी शिकवण्यासाठी पुढाकार घेत असतो. सुपरवायझरदेखील त्याची मदत घेतात. तो कंपनीत मदत करण्यासाठी प्रसिद्ध आहे. संजीवसारखा तो स्टार परफॉर्मर नाही, पण काम व्यवस्थित करतो. कारण तो आपल्या कामासाठी टीमवर अवलंबून असतो. त्याचे सर्वांशी चांगले संबंध आहेत. त्यामुळे त्याच्या यशासाठी सगळेजण मदत करतात.