आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यशासाठी जिंका टीमचा विश्वास!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कार्यालयातील चांगले वातावरण आणि आऊटपुटला चालना देण्या’ बॉस महत्त्वाची भूमिका असते. बॉसच्या मार्गदर्शनामुळेच टीम पुढे जात असते. चांगल्या परिणामांसाठी दोघांचाही एकमेकांवर विश्वास असणे आवश्यक असते. खरेपणाच्या कसोटीवर हे संबंध प्रस्थापित होत असतात. हॉर्वर्ड बिझनेस रिह्व्यूने लक्ष्यप्राप्ती करण्याच्या टिप्स सूचवल्या आहेत...
उदयोन्मुख लीडर्सना टॉप जॉबसाठी तयार करा- कंपनीतील उदयोन्मुख लीडर्सना मोठ्या जबाबदा-यांसाठी तयार करा. त्यांना क्रॉस फंक्शनल प्रोजेक्ट्सचा अनुभव घेऊ द्या. जागतिक व्यवसाय असेल तर आंतरराष्ट्रीय प्रकल्पांचीही जबाबदारी सोपवा. त्यांच्या नेतृत्वगुणांचा विकास करा. या कर्मचा-यांना उद्यमस्तरावर पाठवण्याआधी संघटनात्मक संरचना, व्यवसाय प्रक्रियेतील सुधारणा इत्यादी कार्यकारी कार्यक्रमांचे प्रशिक्षण द्या. जेव्हा हे लीडर मोठ्या पदांवरील जबाबदारी सांभाळण्यासाठी सज्ज होतील तेव्हा त्यांच्यावर युनिटची जबाबदारी सोपवा. त्यांना अनुभवी व लायक टीम द्या. त्यामुळे नवी सुरुवात करणे सोपे जाईल. (स्रोत : ‘हाऊ मॅनेजर्स बिकम लिडर्स’, लेखक : मायकेल टी. व्हॅटकिन्स)
बॉसच्या अनुभवातून शिकायला हवे- संस्थेशी संबंधित सर्व निर्णय स्वत:च घेणा-या बॉसला आपली टीम काहीही करत नसल्याचे वाटत राहते. संस्थेची जबाबदारी सांभाळण्यात टीमचे योगदान नसेल तर याचा अर्थ लीडरशिपच्या पद्धतीत दोष आहे. लीडरनी टीमबरोबर अनुभवांचे आदानप्रदान करावे. त्यांना वैयक्तिक आणि संघनात्मक उद्दिष्टे सांगावी. ती उद्दिष्टे प्राप्त करण्यासाठी टीमचे योगदान महत्त्वपूर्ण असल्याचे त्यांच्या लक्षात आणून द्यावे. त्यामुळे टीम चांगले परफॉर्म करेल. बॉसच्या चांगल्या वर्तन व्यवहारामुळे टीमला प्रोत्साहन मिळते.
(स्रोत : ‘फायर, स्नोबॉल, मास्क, मुव्ही - हाऊ लीडर्स स्पार्क अ‍ॅण्ड सस्टेन चेंज’
लेखक : पीटर फुडा व रिचर्ड हॅडम)
सुधारणा करा, पण खर्चावरही लक्ष ठेवा- कंपनीच्या रचनेमध्ये बदल केल्यामुळे संदिग्धता संपुष्टता येते. त्यामुळे मॅनेजर्स आणि कंपनीत काम करणा-या काही लोकांना पुनर्रचना केलेली आवडेल. ऑर्गनायझेशनल चार्ट तयार करण्याआधी या दोन गोष्टींकडे लक्ष द्या-
- कोणत्या समस्येची उकल करायची आहे?- रचनेत बदल करून तुम्ही ग्राहकांवर लक्ष केंद्रित करू इच्छिता? की खर्चात कपात करायची आहे? की आणखी वेगळेच कारण आहे? बदल करण्यापूर्वी आपले उद्दिष्ट निश्चित करा. त्यामुळे बदल का आणि कितपत आवश्यक आहे हे तुमच्या लक्षात येईल.
- हाच एकमेव मार्ग आहे का?- पुनर्रचनेमुळे काही अडचणी नक्कीच दूर होतील. मात्र त्याला अन्य पर्यायही असू शकतो. कमी खर्चाचे अन्य पर्यायही तपासून पाहा.
(स्रोत : ‘रिआर्गनायझिंग? थिंक अगेन’,
लेखक : रॉन अश्केनॉस)
प्रांजळपणे चूक कबूल करा
बहुतांश मॅनेजर्स आपल्या चुकांवर पांघरूण घालून आपली प्रतिमा उजळ ठेवण्याचा प्रयत्न करतात किंवा ते महान लीडर असल्याच्या आविर्भावात वावरतात. बॉस, लीडर, सल्लागार किंवा मॅनेजर्सनी या मोहापासून दूर राहायला हवे. बॉसच्या अशा वर्तनामुळे टीमवर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो. लोक तुमचा खरा चेहरा शोधू लागतील. त्यामुळे कधीही असत्याचा आश्रय घेऊ नका. खरे बोलल्यामुळे तुम्ही तुमच्या टीमचा विश्वास तर जिंकालच, पण टीम चांगले परिणाम देण्याचाही प्रयत्न करेल. आपल्या चुका प्रांजळपणे कबूल करा.(स्रोत : ‘फायर, स्नोबॉल, मास्क, मुव्ही - हाऊ लीडर्स स्पार्क अ‍ॅण्ड सस्टेन चेंज’ लेखक : पीटर फुडा व रिचर्ड हॅडहम)
ऑफिसपासून दूर बॉसवर टीम नाखुश
ज्या कंपनीचा बॉस टेलिवर्करप्रमाणे ऑफिसपासून दूर राहून काम करतो, कर्मचा-यांशी ज्याचा फारसा संपर्क नसतो, त्या कंपनीचे बहुतांश कर्मचारी आपल्या बॉसवर असंतुष्ट असतात. अशा कर्मचा-यांना वेळोवेळी फीडबॅक मिळू शकत नाही. त्यामुळे ते कामात रस दाखवत नाहीत, असा निष्कर्ष 1.100 कॉर्पारेट कर्मचा-यांचे संशोधन करून टिमोथी डी. गोल्डन आणि अ‍ॅलन फ्रॉमन यांनी काढला आहे.
(स्रोत : ह्यूमन रिलेशन्स)
फीडबॅक देण्याआधी प्रत्येक पैलूचा नीट विचार करा
बहुतांश लोक घटना घडल्यानंतर 24 तासांच्या आत फीडबॅक देण्याचा सल्ला देतात. परंतु घटना घडणे आणि फीडबॅक देण्यामध्ये अंतर आवश्यक असते. तुम्ही घटना पाहून- समजून घेऊन फीडबॅक दिला तर तुमच्या म्हणण्याचा परिणाम प्रभावी असेल. लोकांनीही ते चांगल्या प्रकारे समजण्यास मदत होईल. दरम्यान, तुम्हाला स्वत: तयारीलाही वेळ मिळेल. लोकांना तुमच्याकडून कशा प्रकारच्या फीडबॅकची अपेक्षा आहे, हेही तुमच्या लक्षात येईल. दरम्यानच्या काळात तुम्हाला घटनेचा प्रत्येक पैलू पाहता येईल. दुस-या चे मत जाणून घेता येईल आणि तुमचे म्हणणे प्रभावीपणे मांडता येईल.(स्रोत : हार्वर्ड बिझनेस रिव्ह्यू गाइड टू गिव्हिंग इफेक्टिव्ह फीडबॅक)