आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोनियांच्या उपचारासाठी डॉ. देसाईंना बोलावले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाव : डॉ. संजय देसाई, सर्जन
वय - सुमारे ५३ वर्षे
शिक्षण- युनिव्हर्सिटी ऑफ लिव्हरपूल, नी-शोल्डर ऑर्थोस्कोपिक सर्जरी, केंब्रिज
कुटुंबीय - आई : शीला, वडील : सनत, पत्नी : नीती, दोन मुली : तन्वी, नीवा
चर्चेत का? - ते शाहरुख खानवर उपचार करत आहेत.
काही महिन्यांपूर्वी सोनिया गांधी वाराणसीत रोड शो करत होत्या. अचानक त्या कोसळल्या आणि त्यांच्या डाव्या खांद्याला फ्रॅक्चर झाले. त्यांना तत्काळ चार्टर्ड विमानाने दिल्लीच्या सर गंगाराम रुग्णालयात आणण्यात आले. तेथे उपचारासाठी मुंबईच्या डॉ. संजय देसाईंना बोलावण्यात आले. २२ वर्षांपासून ऑर्थोपेडिक सर्जन असलेले डॉ. देसाई यांनी अडीच तास शस्त्रक्रिया करून ते ठीक केले.

त्यांच्या रुग्णांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, चित्रपट अभिनेता धर्मेंद्र, हृतिक रोशन आणि शाहरुख खानही आहे. २००९ मध्ये एक दृश्य चित्रित करताना शाहरुख जखमी झाला होता तेव्हा त्याला ब्रीच कँडी रुग्णालयात आणण्यात आले. बाहेर माध्यमे आणि फॅन्सची गर्दी होती. शाहरुखच्या खांद्याची जखम कशी बरी करायची, याचा विचार डॉ. देसाई आत करत होते.

जखम झाल्यानंतर शाहरुखने आधी विदेशातील डॉक्टरांशी संपर्क साधला, कारण याआधी त्याने ८ वेळा विदेशातच शस्त्रक्रिया केली होती. एका अमेरिकन डॉक्टरने त्यांना म्हटले की, भारतात शस्त्रक्रिया करायची असेल तर डॉ. देसाईंकडे जा. त्यामुळे तो डॉ. देसाईंकडे आला. डॉ. देसाईंनी राइटिंगटन रुग्णालयातून १९७० च्या दशकाच्या सुरुवातीस टोटल जॉइंट रिप्लेसमेंटचे धडे घेतले होते. या संस्थेला ‘जॉइंट रिप्लेसमेंटची मक्का’ मानले जाते. ब्रिटन, स्पेन, चीन, डेन्मार्क, सिंगापूर, फिलिपाइन्स, थायलंड आणि श्रीलंकेत लाइव्ह डेमॉन्स्ट्रेशनसह शस्त्रक्रिया करणाऱ्या जगातील निवडक डॉक्टरांपैकी ते एक आहेत. अलीकडेच पत्रपरिषदेत शाहरुख आपल्या डाव्या गुडघ्यावर नी-कॅप ठीक करताना दिसला. ती सतत लावून ठेवण्याची सूचना डॉ. देसाईंनी त्याला केली आहे. हृतिक रोशनची जखम अशी होती की, त्याला नृत्य करणेच शक्य नव्हते; पण डॉ. देसाईंच्या शस्त्रक्रियेमुळे तो आज नृत्य करू शकतो. डॉ. जेसाईंची मोठी मुलगी एमबीबीएस करत आहे आणि धाकटी नीवा इंग्लंडमध्ये कायद्याचे शिक्षण घेत आहे. नीवा थिएटरही करते. नीवाला इंग्लंडमध्ये चित्रपटांची ऑफर आली.
बातम्या आणखी आहेत...