आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चार वर्षांत शोधला घातक प्लास्टिक पिशव्यांना पर्याय

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाव : अश्वत हेगडे, उद्योजक
वय- २५ वर्षे
शिक्षण - सेंट टेरेसा हायस्कूल, सेंट अँटनी कॉलेज नरावी, इंदिरा गांधी खुले विद्यापीठ, केम्ब्रिज मार्केटिंग कॉलेज.
चर्चेत का? - त्यांच्या नैसर्गिक स्टार्चने तयार केलेल्या पिशव्यांनी प्लास्टिक पिशव्यांची जागा घेतली.

२०१२ मध्ये मंगळूर महापालिकेने प्लास्टिक पिशव्यांवर बंदी घातली तेव्हा सर्वांनी स्वागत केले, पण येथीलच राहणाऱ्या अश्वतने काही वेगळाच विचार सुरू केला. त्याने विचार केला की, एक अशी पिशवी बनवावी जी जनावरांनी खाल्ली तरी काहीही त्रास होणार नाही. तसेच ती सहजपणे नष्टही करता यावी. चार वर्षांच्या कष्टानंतर अश्वत आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पूर्णपणे संेद्रिय आणि नष्ट होणाऱ्या पिशव्या बनवल्या.

विशेष म्हणजत्यांच्या पिशव्या प्लास्टिक पिशव्यांप्रमाणे आहेत. त्या पाण्यात टाकल्या तर दिवसभरात विरघळून जातील आणि उकळत्या पाण्यात टाकल्यास तत्काळ विरघळून जातील. याचे त्यांनी पेटंट घेतले आहे. यात त्यांनी बटाटा, साबुदाणा, मका, नैसर्गिक स्टार्च, वनस्पती तेल, केळी आणि फुलांचे तेल घेतले आहे.

त्यांच्याकडे एक टीम आहे, ज्यांनी प्रथम या सर्व पदार्थांना तरल रूपात बदलल. ६ टप्प्यांत पिशवीला एक रूप दिले. १३ इंच बाय १६ इंचांची प्लास्टिकची ही पिशवी २.५० रुपयांची आहे. तर अश्वतच्या टीमने तयार केलेली पिशवी ३ रुपयांची आहे. कर्नाटक राज्य प्रदूषण नियंत्रणने यास मंजुरी दिलेली आहे. केंद्र सरकारच्या प्रयोगशाळेत याची तपासणी झालेली आहे. यात प्लास्टिकचे तत्त्व नाहीत. कर्नाटक मिल्क फेडरेशनने आपल्या उत्पादनांसाठी या पिशव्यांची निवड केली आहे. ते दुग्धजन्य उत्पादनांसाठी याचा उपयोग करत आहेत.

अश्वतचे काम कतारमध्येही आहे. तेथे राष्ट्रीय पर्यावरणदिनी ते सादर केले होते. त्यांची इच्छा होती की, मेक इन इंडिया संकल्पनेअंतर्गत ते सादर केले जावे. त्यांच्या कामाचा गौरव झाला. पिशवी २५० ते १००० किलोपर्यंतच्या वजनाचा भार पेलू शकेल एवढी मजबूत करण्याचे आव्हान आता त्यांच्यासमोर आहे. आता ते बंगळुरूमध्ये याच्या उत्पादनासाठी कारखाना सुरू करत आहेत. यात १००० मेट्रिक टन अशा पिशव्या बनवल्या जातील.
बातम्या आणखी आहेत...