Home »Divya Marathi Special» French Actor Diparjo Turn Into Russian

फ्रेंच अभिनेता डिपार्जो झाले रशियन

दिव्य मराठी नेटवर्क | Jan 07, 2013, 04:50 AM IST

  • फ्रेंच अभिनेता डिपार्जो झाले रशियन

आनंद

फ्रेंच अभिनेता डिपार्जो झाले रशियन

फ्रान्सच्या बड्या स्टारपैकी एक असलेले जेरार्ड डिपार्जो यांना अखेर रशियन नागरिकत्व मिळाले आहे. काही दिवसांपूर्वी फ्रान्समधील प्रस्तावित 75 टक्के टॅक्सचा विरोध त्यांनी फ्रान्सचे नागरिकत्व सोडण्याचे वक्तव्य केले होते. फ्रान्सचे पंतप्रधान ज्यां मार्क एयरॉ यांनी डिपार्जोंच्या विरोधात वक्तव्य करत त्यांना ‘पथेटिक’ असे म्हटले होते. त्यामुळे नाराज झालेल्या डिपार्जो यांनी स्वत:चा पासपोर्ट आणि सोशल सिक्युरिटी कार्ड फ्रान्स सरकारला परत केले होते. आता रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी रशियन संविधानातील तरतुदींचा उपयोग करत डिपार्जोंना रशियन नागरिकत्व दिले आहे. 64 वर्षांचे हे अभिनेते रशियन नागरिकत्व मिळाल्याने खूप आनंदी आहेत.

Next Article

Recommended