बॅटल ऑफ डोगराईत ९ सप्टेंबरला ले. कर्नल डेस्मंड हेद यांच्या नेतृत्वात ३ जाट रेजिमेंटने पहिला विजय साकारला होता. त्यांना ‘महावीर चक्र’ने गौरवले होते. एमएफ हसेन यांनी यद्धभूमीवर जाऊन डेस्मंड यांचे चित्र काढत त्यांना ते भेट दिले. होते. आज त्यांचीच शौर्यगाथा... निवृत्त कर्नल डी.एस. शेखावत (यद्धादरम्यान ब्रिगेडियर डेस्मंड यांचे सेकंड इन कमांड होते) यांच्या लेखनीतून..
तेव्हा मी सिलिगुडीमध्ये नियुक्त होतो. अचानक मला पंजाबात बोलावून घेण्यात आले. मी बटालियन लोकेशनवर पोहोचताच कमांडिंग ऑफिसर डेस्मंड हेद भेटले. मी तेव्हा बटालियनचा सर्वात वरिष्ठ मेजर होतो. वय होते ३४ वर्षे. मला सेकंड इन कमांडची जबाबदारी देण्यात आली. डेस्मंड माझ्यापेक्षा चार वर्षांनी मोठे होते. मला पाहताच ते म्हणाले, युद्ध सुरू करण्यासाठी आम्ही तुमचीच वाट पाहत होतो. आम्ही रात्री उशिरा जेवण केले व शेतातच झोपलो. ते मला रणनीती समजवू लागले. म्हणाले, मी डावीकडच्या मार्गाने डोगराईत जाईन, तुम्ही उजवीकडून या. त्या रस्त्यांवर भूसुरुंग नाहीत. मी डोगराईवर कब्जा करताच तुम्ही तासा-दोन तासांत एमएमजी व रणगाडे घेऊन दाखल व्हा. मी म्हणालो, जेथून माझी पलटण आणि तुम्ही जाल मीही तिथूनच येईन. ते पहाटे जवानांसोबत मार्गस्थ झाले. रस्त्यात भूसुरुंग होते. काही जवान जखमी झाले. हेद यांनाही जखमा झाल्या. त्यांनी
आपल्या चारही कंपन्यांना टार्गेट दिले होते. कुणी कुठून कब्जा करायचा हे आधीच ठरलेले होते. रणनीती इतकी यशस्वी ठरली की आम्ही पाकिस्तानच्या १०० जवानांना त्यांच्या ओसह बंदी बनवले. शत्रूंच्या रणगाड्यांचा वर्षाव आणि हवाई हल्ल्यांतही आमची बटालियन आगेकूच करत राहिली. ९ सप्टेंबरला शत्रूने पॅटन व शेरमन रणगाड्यांनी हल्लाबोल केला. हेद यांच्या नेतृत्वात आम्ही शत्रूचे पाच रणगाडे नष्ट केले. शत्रूचा पराभव झाला आणि आम्हाला ‘मास्टर्स ऑफ डोगराई’ नामभिदान मिळाले. त्या विजयानंतर पंतप्रधान लालबहादूर शास्त्री आमच्या बटालियनला भेटायला आले. तेथेच त्यांनी ‘जय जवान-जय किसान’चा नारा दिला.
निधनाच्या काही दिवसांआधी डेस्मंड आपले घर कोटद्वारहून रेजिमेंटल सेंटर बरेलीत आले होते. तेथे आपल्या पत्नीच्या कबरीशेजारी स्वत:ची कबर बांधली. त्यावर चिरेही बसवले. परत जाऊ लागले तेव्हा सेंटरचे सुभेदार मेजर म्हणाले - साब, तुमची तब्येत बरी नाही, थोडा विसावा घ्या मग जा. हेद म्हणाले - मी २५ सप्टेंबरला येईल. आणि २५ सप्टेंबरलाच कोटद्वारमध्ये त्यांचे निधन झाले.
शब्दांकन : उपमिता वाजपेयी