आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कसाबपासून हेडलीपर्यंत 26/11 चा प्रवास

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


मोहंमद अजमल कसाब : एकमेव जिवंत पकडलेला दहशतवादी कसाबला 21 नोव्हेंबर 2012 रोजी फासावर चढवले.
फहीम अन्सारी, सबाउद्दीन अहमद : लष्कर-ए-तोयबाला नकाशे पुरवल्याचा आरोप. पुराव्याअभावी न्यायालयाने मुक्त केले. मात्र, उत्तर प्रदेशात रामपूर येथे सीआरपीएफच्या शिबिरावरील हल्ला प्रकरणात दोघांवर खटला सुरू आहे.
जबिउद्दीन अन्सारी : हल्लेखोरांना हिंदी शिकवल्याचा आरोप. हल्ल्याच्या वेळी कराचीतील ‘कंट्रोल रूम’मधून निर्देश देणा-या 6 जणांपैकी 1 असल्याचा आरोप. पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले आहे.

डेव्हिड हेडली : 2006 ते 2008 दरम्यान अनेक वेळा भारतात येऊन रेकी केली. 2009 मध्ये अमेरिकेत अटक. मार्च 2010 मध्ये गुन्हा मान्य केला. लष्करसाठी काम करण्यासह 12 गुन्ह्यांसाठी 35 वर्षांची शिक्षा.
तहव्वूर राणा : हेडलीचे दहशतवादी संघटनांशी संबंध असल्याचे ठाऊक असूनही त्याला इमिग्रेशन एजन्सीचा वापर करू दिल्याचा आरोप. मुंबई हल्लाप्रकरणी अमेरिकन न्यायालयाने निर्दोष ठरवले, पण हेडलीस मदतप्रकरणी 14 वर्षांची शिक्षा.


हाफिज सईद : लष्करला आर्थिक मदत करणा-या जमात-उद-दावाचा म्होरक्या. मुंबई हल्ल्याचा मुख्य सूत्रधार असल्याचा आरोप. भारताने अनेक प्रयत्न करूनही पाकिस्तानाने कोणताही खटला भरलेला नाही. अमेरिकेने त्याच्यावर इनाम घोषित केले, पण तो पाकिस्तानात मोकाट आहे.


जकी-उर-रहमान लखवी : लखवी आणि इतर 6 संशयितांवर हल्लेखोरांना प्रशिक्षण दिल्याचा आरोप आहे. हल्लेखोरांना शस्त्रे उपलब्ध करून दिली. पाकिस्तानी न्यायालयात खटला सुरू आहे.


अमेरिकेला या 6 जणांचा शोध : इलियास काश्मिरी (ड्रोन हल्ल्यात मारला गेला), अब्दुल रहमान हाशिम सय्यद ऊर्फ पाशा, साजीद मीर, अबू कहफा, मजहर इक्बाल आणि मेजर इक्बाल (पाकिस्तानी सैन्यात अधिकारी असून लष्कर-ए-तोयबासाठी काम करण्याचा आरोप).