आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

डिस्नेच्या अँनिमेशन फिल्मची धूम; फ्रोझनने बॉक्स ऑफिस केले गरम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

डिस्नेचा अँनिमेशनपट फ्रोझनने मुलांसहित प्रौढांनाही भुरळ घातली आहे. 22 नोव्हेंबरला मर्यादित रिलीझनंतर चित्रपटाने जगभरात 91.40 कोटी डॉलर कमावले आहेत. त्याने 2013 मध्ये तिसरा सर्वाधिक चालणारा चित्रपट द हंगर गेम्स - कॅचिंग फायरला मागे टाकले आहे. त्याला सवरेत्कृष्ट अँनिमेशनपट आणि सवरेत्कृष्ट गाण्यांसाठी ऑस्कर नॉमिनेशन मिळाले आहे. त्याच्या साउंड ट्रॅकने चार वेगवेगळ्या आठवड्यात बिलबोर्ड अल्बम चार्टमध्ये टॉप केले आहे. यापूर्वी 2003 मध्ये बॅड बॉइज दोनच्या साउंड ट्रॅकला हे यश मिळाले होते.

डिस्नेने चित्रपटाचे म्युझिकल व्हर्जन बनवण्याचे घोषित केले आहे. त्यावर थीम पार्क बनवण्याचेदेखील संकेत आहेत. दोन आठवड्यांपूर्वी चित्रपटाचे नवे व्हर्जन रिलीझ करण्यात आले होते. अमेरिकेत डिस्नेच्या कोणत्याही अनिमेशनपटाने एवढी कमाई केलेली नाही. डिस्नेच्या स्टोअरमध्ये फ्रोझनशी निगडित वस्तू उदा. बाहुली, कॉश्च्युम्स यांची प्रचंड विक्री होत आहे.

फ्रोझन इंटरनेटवरदेखील लोकप्रिय आहे. अमेरिकेत मिनियापोलिसची 23 वर्षीय लिझा रोझेनबर्गला फ्रोझनमधील राजकुमारीसारखे दिसायचे आहे. लिझा आणि तिची मैत्रिण मिगन मेरीने ऑनलाइन सांगितले की, त्या चित्रपटातील नायिकेचे कॉश्च्युम बनवत आहेत, तेव्हा फेसबुकवर असाच एक प्रयोग करणार्‍या एका गटाने त्यांना निमंत्रित केले.
हॅन्स क्रिश्चन अँडरसन यांची 1845 ची कथा द स्नो क्वीन वर आधारित चित्रपट राजकुमारी एल्सा आणि तिची लहान बहीण अँनावर केंद्रित आहे. एक आकर्षक राजकुमारही कथेचा भाग आहे. चित्रपटाली एक गाणे ‘लेट इन गो’ खूप गाजले आहे. डिसेंबरपर्यंत त्याचे संगीत व्हिडिओ ट्यूबवर साडेआठ कोटी वेळा पाहिले गेले. डेमी लोव्हेटोच्या रॉक व्हर्जनला सहा कोटी 90 लाख दर्शक मिळाले. यूट्यूब सर्चवर 30 लाख इतर व्हिडिओ आले.

चित्रपटाचे इतरही परिणाम दिसू लागले आहेत. पती रॉबर्ट लोपेझसोबत चित्रपट गीत लिहिणारी क्रिस्टेन अँडरसन लोपेझने टाइमला सांगितले, गाण्यांनी काही मुलांना बोलण्याच्या अडथळ्यांतील समस्येवर नियंत्रण मिळवण्यात मदत झाली आहे.