आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मेरे दो अनमोल रतन, एक है राम तो, एक लखन...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
' मेरे दो अनमोल रतन,
एक है राम तो , एक लखन '
राम लखन , राम लखन। …… "
जगन्माता तल्लीन होवून भजन गात आहे। समोर राम, लक्ष्मण आणि सीता ची सुंदर मूर्ती , त्यासमोर एक सुवासिक उदबत्ती दरवळतेय। भजनात तल्लीन झालेल्या त्या मातेला मागून कुणीतरी टाळ्या वाजवल्याचा भास् होतो , ती मागे वळून बघते , बघते तो काय मागे साक्षात राम , लक्ष्मण उभे , ते ही तल्लीन होवून टाळ्या वाजवताहेत , माता चपापली। अरेच्या , आज यांना कसा वेळ मिळाला , एरवी तर आपण एकटेच असतो आज हे दोघे कसे काय बुवा , असेल वेळ सद्ध्या तसेही कुणालाच काम नाही। सगळीकडेच राज्य जात आहे , अनमोल रतन तरी काय करणार ? , वेळ कसा घालवणार ? तेव्हा आले असतील फिरत फिरत, असा विचार करून माता स्मितहास्य करते। पण दोघांच्या चेहऱ्यावर असा क्रोध का दिसतो आहे ?
' काय रे बाळांनो ? काय झाले ?
' बघ ना माते , हा भैया मुळीच नीट वागत नाही , याला एक टप्पू दे बर।
काय हे , टप्पू काय ? बाळा तुझा जीजाजी आहे तो। तूच त्याला आदराने हाक मारली नाहीस तर जनता तरी कसे आदराने बघेल त्याच्याकडे सांग बर ?
मग तसे वागायला हवे ना आई त्याने।
काय केले सांग बर तुझा जिजू ने ! माझा लखन ने !
हूँ ! म्हणे लखन ! अग आई , ते हनुमानसारखे वागताहेत।
हाऊ बेटा ?
शेपटीला स्वतःच आग लावून गावभर भटकत असतात। जिथे थांबतील तिथे आग लावतात जिज्जू !
नीट सांग बाळा काय झाले। वरचेवर यांच्या बद्दल तक्रारी वाढत चालल्यात १ कुणाशी भांडण केले का / ठोसा मारला का ? मारामारी केली का तुझ्या जीज्जु ने ? आँ ?
अग आई ! भांडलास काय विचारतेस ? मीडिया वाल्यांशी पंगा घेतलाय जिज्जुनी। सकाळपासून ब्रेकिंग न्यूज़ सुरु आहे साऱ्याच चैनल वर।
' का रे लखन ? असे का वागतोस ?
"मन की बात ' माते।
मन की बात ' ? म्हणजे ? तु स्वतःला काय ' नमो ' समजतोस होय ? त्यांनी ' आकाशवाणी ' वर ' मन की बात ' सुरु केली आहे एवढे माहीत आहे मला। लखन तुझी काय ही भानगड़ ' मन की बात ' ची ?
का ? मोदीजींना च अधिकार आहे काय ? मी पण केली मन की बात। मीडिया वाल्यांनी मला भड़कावले प्रश्न विचारुन। मग माझ्या मनात जे आले ते केले मी।
व्वा ! अरे आपले घराणे कोणते तू करतो काय ? आपले आडनाव काय ? काही तर ठेव आपली मार्केट मध्ये ? की सर्व घालवायचीच ठरवले आहे ? अरे , आपले कुटुंब या देशात प्रथम कुटुंब आहे। अशी मन की बात उघड्यावर करता येत नाही। काही वेळेस मन की बात मनातच दफ़न करायची। हा बघ बर कसा शांत राहतो , अरे ला कारे करत नाही।
हं ! म्हणूनच तर आपल्याला पाच वर्षासाठी वनवासात जावे लागले। ' नमो ' च्या अरे ला कारे केले असते तर ही वेळ आली असती का ? नाही ना ? याचे कौतुक काय सांगता माते , यांचे रक्त उसळत नाही त्यामुळे आपल्याला वनवास मिळाला। आणि आता मीडियावाले माझे रक्त उसळवतात आहेत फुकटचे। म्हणून करावी लागते आठवड्यातून एकदा मन की बात ' रग असावी लागते त्यासाठी अंगात। ' असे म्हणत लखन दंडावरची बेंडकुळी फुगवतो आणि दोघांनाही दाखवतो आणि स्वतःच खुश होतो।
' तसे नाही ! संयमी आहे तो। मोठ्यांचा आदर करणे येते त्याला। मोदी काका वयाने मोठे आहेत ना , म्हणून त्याने त्यांच्या विरोधात शड्डू नाही ठोकला। होना रे' राम ' ? म्हणत माता रामाला कुरवाळते तसा तो लाजुन अजूनच लाल होतो।
' मॉम , त्याला समजावून सांगा हं , त्याच्यामुळे आपल्या खानदानाचे नाव धुळीस मिळते आहे।
' आणि तुझ्यामुळे रे ! सारे वजीर तुला नाव ठेवताहत , लढता येत नाही म्हणून। अरे मला चांस दिला असतास तर ………… !
तर काय एवढ्या सीट्स ही आल्या नसत्या असेच ना ?
हे बघ मला चिडवू नकोस हं।
तर काय ? दर २/४ दिवसांनी काही तरी कारनामे करायचे आणि आमचे ' गांधी ' आडनाव खराब करायचे , हाच उद्योग अखंड सुरु आहे , म्हणे मन की बात।
खोट ! मी एकटाच नाही काही। असे कितीतरी लोक गोळा केले आहेत तुम्ही लोकांनी तुमच्या आजूबाजुला, म्हणून ही वेळ ओढावली आहे तुमच्यावर।
बघ ! म्हणजे तुला पण जाण आहे की तू ही त्यांच्यासारखा आहेस , होना लखन ।
मॉम ! तुम्ही पण ? तुम्ही तर माझी साइड घ्या ! तुमच्या मुलीला बघा कसे फुलासारखे ठेवले आहे।
अंह ! उलटे बोललास तू लखन ! अरे आम्ही सारे मिळून तुला फुलासारखे संभाळतो आहे। आमचे कुटुंब आणि पूर्ण पार्टी मिळून। ' कबीरदास म्हणतात ना ' बोया बीज बबुल का , आम कहां से आये ' अशी अवस्था करून ठेवली आहे , सुधारण्याचा प्रयत्न करा , आपल्या नावाला बट्टा लावू नकोस रे लखन।
रक्त उसळते मॉम , मी काय करू ? आणि बापू ही हेच सांगायचे।
काय सांगायचे ?
की अन्याय कारणाऱ्यापेक्षा सहन करणारा दोषी असतो , म्हणून .......
म्हणून काय ? अहिंसेचा मार्ग धरायचा ?
नाही , फ़क्त मन की बात करायची ! ह्या ह्या ह्या ह्या
मन की बात , मन की बात ! काय एकच पालुपद लावले आहे हे ?
माझावर डाफरता , नमो ना शिकवा बर………।
हे बघ लखन , तुझे रक्त उसळते ना ? जोर बैठका कमी मार रे , व्यायाम कमी कर , काही काम धंधा कर।
काम नको , धंधा करणार मॉम मी , आणि टेच तर करतो आहे तुमच्या कृपेने।
आता हुड्डा अंकल नाही लखन , नमो चे साफसफाई अभियान देशभर सुरु आहे लक्षात आहे ना ?
माय गॉड मॉम , आता ?
आता एकच कर रामायण वाच , त्यात वनवसात कसे संयमी राहावे , वल्कले नेसावीत , कंद मुळ खावून दिनचर्या चालवावी असे नमूद केले आहे। वनवास म्हणजे चिंतन , केलेल्या चुकांचे प्रायश्चित्त। राजारामने वनवासात राहूनच वानरसेना जमवली , माणसे गोळा केली आणि अखेरीस विजय संपादन केला। वाचा एकदा पूर्ण म्हणजे प्रकाश पडेल।
मॉम ! आपली वानरसेना तर तयारच आहे ……।
हो पण या वानरसेनेने असलेले साम्राज्य बुडवले आहे , ही सेना नव्हे फ़क्त वानर होते। फळाच्या झाडावर चढायचे आणि झाड़च खावून टाकायचे।
म्हणजे आता नवीन वानरसेना उभारायची।?
यस ! अर्थातच !
प्रयत्न करेल मॉम , आधी मी सुधारेन मग तू म्हणतेस तसे वानरसेनेचे बघु।
पटल ! आधी तु माणसात ये , वानरांचे नंतर पाहु। आता यापुढे तक्रार नको , नो मारामारी आणि दबंग गीरी काय ?
ओके मॉम ! आता आठवड्यात एखादी तकरार यायची ना ?
हो !
आता महिन्यातून एखादे वेळेस 'मन की बात ' , चालेल ?
पुन्हा तेच !
हळू हळू सुधारेल ना मी। पांच वर्ष आहे ना आता आपल्याला ? घाई काय आहे ?
पटतय हं बाळांनो ! प्रॉमिस ना ? हा वनवास फार कठीण असतो हाँ , त्या भाजपा च्या नेत्यांना विचार त्याचे दुख , मग लक्षात येईल मी काय म्हणते ते !
वुई नो मॉम ! आडवाणी अंकल ना पाहात पाहात लहानचे मोठे झालोत आम्ही। हाउ कैन वुई फॉरगेट ? रिलैक्स मॉम , रिलैक्स ! बर जाऊ आता मी ?
आता कुठे निघालात दोघेही ?
आधी जिम ला , नंतर गोल्फ खेळणार , त्यानंतर लंच मग हॉर्स राइडिंग , नंतर ………।
काय चालले काय हे ? अरे काम कधी करणार ? संघटन कधी मजबूत करणार ? वानरसेना कधी तैयार करणार माझ्या राजांनो , आणि या पुढे नो " मन की बात " काय ?
करणार ! सर्व काही करणार ! वानरसेने साठी वानर आम्ही जिथे जातो तिथेच सापडतात ना मॉम। कम ऑन। रिलैक्स। तु आपले भजन कर , कीर्तन कर आमच्यासाठी प्रार्थना कर !
ओके बाय ! टाटा टेक केयर !
मातेच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहु लागतात , होय रे बाळांनो , तुमच्यासाठी प्रार्थना तर करावीच लागणार ! असे म्हणून माता पुन्हा अलगद डोळे लावते आणि भजन आळवण्यास सुरुवात करते " मेरे दो अनमोल रतन , एक है राम , एक लखन ! राम लखन , राम लखन ............. !!!!!!
धनंजय एकबोटे ,
४१ , तुळजाई ,
श्री नगर ,उल्का नगरी ,
औरंगाबाद - ४३१००५
मोबाइल - ९८२३५५५९०५