आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भविष्यातील ‘स्मार्ट होम’ नसेल एखाद्या करिष्म्यापेक्षासुद्धा कमी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अ‍ॅलेक्स हॉकिन्सनचे घर जाणते की त्याला दिवसभर काय करायचे आहे. दोन मुलांचे पिता हॉकिन्सन अंथरुणातून उठल्याबरोबर उजेड पसरू लागतो. हवा तापू लागते. ते पायर्‍यांवर खाली उतरतात, तेव्हा सोनो साउंड सिस्टिमवर एक आवाज त्यांचे स्वागत करतो. दिवसाच्या हवामानाची स्थिती सांगतो. त्यांच्यासाठी आपोआप कॉफी तयार होते. हॉकिन्सन आपला फोन चेक करतात. त्यांचा चार वर्षांचा मुलगा नाष्टा न करताच घराबाहेर पडला तर फोनवरून माहिती येऊन ठेपते.

जर सर्व काही हॉकिन्सन यांच्या नियोजनाप्रमाणे चालले तर पुढील दहा वर्षांत अमेरिकेत प्रत्येक कुटुंब अशाच पद्धतीने राहील. त्यांची कंपनी स्मार्ट थिंग्जने असा प्लॅटफॉर्म बनवला आहे, ज्यामुळे घरातील वस्तू आणि सामान उदा. दरवाजे, कुलूप, लाटि-बल्ब एकमेकांशी बोलू शकतात. तुमच्यासाठी प्राधान्याचे काय आहे, हेदेखील ते ठरवू शकतील. या प्लॅटफॉर्मसाठी स्मार्टफोन आणि 200 डॉलरच्या स्टार्टर किटची गरज पडते. हॉकिन्सन म्हणतात, ‘आम्हाला वाटते की घरात तुम्हाला सुरक्षा, सुविधा, मन:शांती आणि बरेच काही मिळावे. ’

गेल्या काही वर्षांत क्लाऊड कॉम्प्युटिंग आल्यामुळे इंटरनेटशी जोडले जाऊ शकतात असे गॅजेट्स बनवणे सोपे झाले आहे. हे गॅजेट्स स्मार्टफोन अ‍ॅपद्वारे नियंत्रित केले जाऊ शकतात. आयएसएच टेक्नॉलॉजी संशोधन संस्थेच्या सहसंचालक लिझा एरोस्मिथ सांगतात, लोक घरांमध्ये 2018 पर्यंत चार कोटी पन्नास लाख स्मार्ट होम सेवांचा वापर करू लागतील. अ‍ॅपल, एटी अँड टी आणि गुगलसह अनेक कंपन्या इंटरनेटला कमांड करणारी सिस्टिम बनवण्याच्या तयारीत आहेत.
2012 मध्ये सुरू झालेल्या स्मार्ट थिंग्जकडे मोठ्या टेक कंपन्यांच्या तुलनेत कमी सोयी सुविधा आहेत. तरीदेखील या बाबतीत त्यांच्यात पुढे येण्याची क्षमता आहे. इतर कंपन्यांच्या तुलनेत त्यांचे हजारो ग्राहक अनोखा अ‍ॅप बनवण्याच्या तयारीला लागले आहेत. स्मार्ट थिंग्जचा वाय-फायवर चालणारा हब कोणत्याही गॅजेट अथवा सेन्सॉरशी जुळून युजरला एका अ‍ॅपच्या माध्यमातून जोडण्याची सुविधा देतो. इतरही त्याचा वापर करू शकतील, या हेतूने हॉकिन्सनने युजर्सना त्यांच्या स्वत:च्या बनवलेल्या प्रोग्रामला स्मार्ट थिंग्जच्या ओपन प्लॅटफॉर्मवर अपलोड करण्याची सुविधा दिलेली आहे. अनेक युजर्सनी कल्पक अ‍ॅप बनवलेले आहेत. आतापर्यंत सुमारे पाच हजार जणांनी स्मार्ट थिंग्जवर आपले प्रोग्राम शेअर केलेले आहेत.