आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTOS - बहरीन महाराष्ट्र कल्चरल सोसायटी गणपती उत्सव 2014

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो - ( बहरीनच्या महाराष्ट्र मंडळातील गणपती 2014 )
बहरीन - कोटी कोटी रुपे तुझी, कोटी चंद्र सूर्य तारे, कुठे कुठे शोधू तुला, तुझे अनंत देव्हारे... असं म्हणत बहरीनमध्ये (UAE) वास्तव्याला असलेल्या भारतीयांनी गणपती बाप्पाचे वाजत गाजत आगमन केले.
आपली भारतीय संस्कृती टिकून राहावी आणि आपल्या मुलांना त्या सणाचे काय महत्त्व काय आहे याची जाणीव होण्यासाठी जगभरातील अनेक देशांमध्ये असलेल्या 'महाराष्ट्र मंडळांमध्ये' गणपती उत्सव आनंदाने साजरा करण्यात येतो.
आज आम्ही बहरीनच्या महाराष्ट्र मंडळात कशा पद्धतीने गणपती उत्सव साजरा करण्यात आला याबद्दल माहिती देणार आहोत.
29 ऑगस्ट रोजी वाजत गाजत ग़णपती बाप्पाचे स्वागत बहरीनच्या महाराष्ट्र मंडळात करण्यात आले. यावेळी शहरात असलेली भारतीय मंडळी उत्सव साजरा करण्यासाठी एकत्र जमली होती. भारतामध्ये ज्या पद्धतीने ढोल-ताशांच्या गजरात गणपतीचे आगमन आणि विसर्जन करण्यात येते तशाच पद्धतीने येथे देखील ढोल-ताशांचा ताल धरण्यात आला. यावेळी भारतातील सर्वच मंडळींनी (महिला/पुरुष) पारंपारिक वेश परिधान केला होता.

भारतामध्ये ज्या पद्धतीने गणपती काळामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते त्याच पद्धतीने येथे देखील कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
पुढील स्लाइडवर पाहा बहरीनच्या महाराष्ट्र मंडळातील गणपती उत्सवाची काही छायाचित्रे....
( सौजन्य - महाराष्ट्र कल्चरल सोसायटी बहरीन )