आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गर्गच्या देखरेखीत नोटा छपाई

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नोटबंदीनंतर जे सर्वाधिक महत्त्वाचे काम होते ते नव्या नोटा छापून बँकांपर्यंत पोहोचविणे. याची जबाबदारी होती सीएनंतर आयएएस झालेले प्रवीण गर्ग यांची.

प्रवीण गर्ग मध्य प्रदेश केडरचे आयएएस अधिकारी आहेत. दिल्लीच्या मॉडर्न स्कूलमध्ये शिक्षण. दिल्ली विद्यापीठातून बीकॉम केल्यानंतर सीए केले. ५५ वर्षीय गर्ग मध्य प्रदेश राज्य औद्योगिक महामंडळाचे आयुक्त आणि व्यवस्थापकीय संचालक या पदांवर होते. आर्थिक प्रकरणातील विभागात संयुक्त सचिव होते. नोटबंदीनंतर त्यांना सिक्युरिटी प्रिंटिंग अँड मिंटिंग काॅर्पोरेशन ऑफ इंडिया लि.(एसपीएमसीआयएल) चे प्रमुख बनविले गेले आहे. त्यांच्याकडेच नोटांना तत्काळ छापून देण्याची जबाबदारी आहे. त्यांच्यापूर्वी या पदावर एम.एस. राणा होते. न्यायालयाच्या आदेशानुसार त्यांना हटविले गेल. गर्ग यांना आणण्यात आले. एसपीएमसीआयएलला मिनीरत्नचा दर्जा दिलेला आहे.
बातम्या आणखी आहेत...