आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Germany Film Fans And Common People Flock To Berlin Film Festival

बर्लिन फिल्म फेस्टमध्ये दिसतेय जर्मन नागरिकांचे सिनेमावेड

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बर्लिन : मी सिनेमाचा वेडा आहे, माझ्या इतकं कुणी सिनेमा पाहुच शकत नाही, मी सिनेमा जगतो असं छाती ठोकपणे सांगणारा कुणी भेटला तर ती जर्मन नागरिक अाहेत. कारण ही माणसं नुसती सिनेमा वेडी नाहीत तर ते सिनेमा जगतात. त्यासाठी काहीही करण्याची तयारी जर्मन नव्हे तर युरोपातल्या प्रत्येक सिनेप्रेमीची असते. याचा अनुभव मला जर्मनी येथे सुरू असलेल्या 65 व्या बर्लिन आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टीवलमध्ये आला. अांतरराष्ट्रीय चित्रपट महाेत्सव अनुभवण्याचा हा माझा पहिलाच अनुभव.

बर्लीन शहरात सिनेमा पाहण्याची सुमारे 10 ठिकाणं आहेत. या सर्व ठिकाणी फिल्म फेस्टीवलच्या फिल्म पाहता येतात. आम्हा पत्रकारांसाठी बहुतांश सिनेमे फुकटात पाहता येतात.

फिल्म फेस्टीवलची सुरुवात गुरुवारी झाली. आम्ही सर्व सिनेमा बघण्यासाठी सज्ज होतो. सकाळची वेळ होती. त्यामुळं सहज फेरफटका मारण्यासाठी आर्केट मॉलमध्ये गेलो, तिथं तिकिटीसाठी लांबच लांब रांग होती. माझ्या सोबतच्या लोकांना त्याबद्दल विचारल्यावर समजलं की ही मोठी रांग सर्वसामान्य लोकांची आहे. त्यांना दिवसभर वेळ नसतो त्यामुळं सकाळी येतात, रात्रीच्या शोचं तिकिट काढतात. दिवसभर काम करतात आणि मायनस 5 डिग्रीच्या थंडीत सिनेमा पाहण्यासाठी धावत सुटतात. आपल्याकडे हे वेड कदाचित विकएन्डला पहायला मिळेल. पण यांच्याकडे आठवड्याच्या दिवसांतही पहायला मिळतं. मी दुस-या दिवशी सकाळी गेलो तेव्हा या टिकिट काऊंटरच्या बाहेर काही काही लोक झोपलेले दिसले. अगदी अंथरुण घालून अनेक जण चक्क घोरत होते. काही वेळानं जेव्हा टिकीट काऊंटर उघडलं तेव्हा ते लागलीच उठले. आपआपले तिकिट काढून निधून गेले. त्यांना ऑफिस गाठायचं होतं. विकएन्ड साठीचा सिनेमाचा बेत त्यांनी करुन ठेवला होता. शनिवार रविवारी अगदी कुटुंबाससहित सिनेमा पाहण्याची लगबग दिसत होती.

युरोपात सिनेमा थिएटरमध्ये जाऊन पाहणं ही चैन आहे. 3 ते 6 युरो पर्यंत तिकिटांचे भाव आहेत. हे सर्वांना परवडणारे नाहीत. बहुतांश लोक भाड्याच्या घरात राहतात. भाडं 500 ते 1000 युरो असतं. एका घराचा कुटुंब प्रमुख सुमारे हजार ते दीड हजार कमवत असतो. त्यात टॅक्स, मुलांचं शिक्षण आणि महिन्याभराचं रेशन हे करताना नाकीनऊ येतात. मग घरातली महिला ही कमाईसाठी बाहेर पडते, कॉलेजला जाणारी मुलंही काही ना काही काम करतात. मग कुठल्या मॉलमध्ये झाडू मारण्याचं का असेना. कॅश काऊंटर, वेटर, असं सर्व कामं करतात.

जर्मनीत कुटुंब व्यवस्था भारतीसारखीच आहे. आजी, आजोबासह सर्व कुटुंब एकत्र राहतं. कसं बसं चालतं या कुटुंबाचं. या सर्व व्यापात सिनेमासारखी चैन परवडत नाही. तरीही रात्रीचा दिवस करुन हे सर्व सिनेमाचं वेड जोपासताना दिसतात.

दुस-या महायुध्दात युरोपात मोठी बेरोजगारी आली, लाखोंचं स्थलांतर झालं. जिथं काम मिळेल तिथं जाणा-या या लोकानी जिथं गेला तिथं सिनेमा पाहिला आणि जोपासलाही.

बायसिकल थिव्स बनवणारा डिसिकाही युरोपातलाच. फेनीनी असो किंवा मग फ्रान्सच्या नव्या फिल्म क्रांतीची मुहुर्तमेढ करणारे त्रुफो किंवा गोदार्द. या सर्वांनी अगदी कठिण काळात सिनेमा जपला आणि जोपासलाही. युरोपातल्या सिनेमा प्रेक्षकांच्या प्रेमाशिवाय हे शक्य नव्हतं. कारण सिनेमा हा फक्त छंद नसून त्यांच्या साठी तो जगण्याचे माध्यम झाले आणि अजूनही आहे.

बर्लीनाल प्लास्ट या मुख्य थिएटरबाहेर आपल्या आवडत्या अभिनेता अभिनेत्रीला बघायला प्रचंड गर्दी होते. क्रेझी फॅन फॉलोईंग. आपण साऊथमध्ये अनुभवतो ना तशी. पण ही फक्त कुठल्या भाषेशी निगडीत नाही. त्याची नाळ सिनेमाशी जोडलेय, मग तो कुठल्याही भाषेतला असो.

बर्लीनच्या फिल्म फेस्टीवलच्या वेळी टॅक्सी जफर पनाहीच्या इराणी सिनेमाची तिकिट मिळालं नाही म्हणून कुणी टॅक्सीचं तिकिट देईल का असं चिटोरा हातात घेऊन थिएटर बाहेर उभा राहणारा सिनेरसिक युरोपातच मिळू शकतो. म्हणूनच आज युरोपातली सिने संस्कृती टिकून आहे असं म्हणायला हरकत नाही.