आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

धूम्रपान सोडले तर मिळू शकतो रग्गड पगार!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जर तुम्ही धूम्रपान करत असाल तर ठीक आहे; पण जर तुम्ही धूम्रपान सोडले असेल तर, ते कायमचेच सोडा. कारण तसे केल्यास तुम्हाला चांगला पगार मिळू शकतो. फेडरल रिझर्व्ह बँक ऑफ अटलांटातर्फे करण्यात आलेल्या सर्वेक्षणात ही माहिती समोर आली आहे. धूम्रपान करणा-या कर्मचा-यांच्या वेतनावर परिणाम होतो. जे लोक धूम्रपान करतात त्यांना धूम्रपान न करणा-यांच्या 5 टक्के अधिक पगार मिळतो.


या सर्वेक्षणात हेही समोर आले की, ज्यांनी एका वर्षापूर्वी धूम्रपान सोडले त्यांचा पगार धूम्रपान करणा-यांपेक्षा आणि कधीही धूम्रपान न करणा-यांपेक्षाही चांगला होता. धूम्रपान न करणा-यांना, धूम्रपान सोडणा-यांपेक्षा 5 टक्के कमी पगार मिळाला. पण असे का? हा प्रश्न उभा राहतो. संशोधनानुसार आधी धूम्रपान करणा-यांना अधिक सन्मान मिळतो, कारण त्यावरून त्यांचा दृढनिश्चय दिसून येतो. तसेच संयम म्हणजेच तो सहजपणे एखादी सवय सोडू शकतो हेही स्पष्ट होते.


त्यावरून तुमच्या लक्षात येईल की, पूर्वी धूम्रपान करणारे त्यांच्या वरिष्ठांवर प्रभाव पाडण्यात यशस्वी होतात. तरीही कधीच धूम्रपान न केलेल्या व्यक्तीपेक्षा अधिक पगार कसा मिळू शकतो? हा प्रश्न कायम राहतो.
सतत धूम्रपान केल्याने कामावर त्याचा परिणाम होतो. त्यामुळ तुमचे वरिष्ठही कामावर नाराज असतात; पण संशोधकांच्या मते असे होत नाही. जर धूम्रपानाचा कामावर परिणाम झाला असता तर धूम्रपान करणा-यांच्या पगारात व इतरांच्या पगारातील तफावत फार जास्त वाढली असती. याची इतरही काही कारणे असू शकतात, असे संशोधनाचे प्रमुख एन. मेलिंडा पिट्स यांनी एका मुलाखतीत सांगितले.


(स्रोत : हॉवर्ड गॅझेट)