आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समस्या, अन्य संस्कृती समजून घेतल्यास मिळेल यश

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अनेकदा कामावर लक्ष नियंत्रित करण्यात अडचणी येतात. याची अनेक कारणे होऊ शकतात. उदा. इनबॉक्समध्ये जास्त ई-मेल्स असणे, ज्यात अनावश्यक ई-मेल्स अथवा सहकाऱ्यासोबत भांडण-तंट्याचा समावेश आहे. या दोन समस्यांचा सहज निवाडा होऊ शकतो. वाद उद‌्भवण्याच्या कारणापर्यंत पोहोचा आणि इनबॉक्स रिकामा करा. यासंदर्भातील टिप्स हार्वर्ड बिझनेस रिव्ह्यूमधून वाचा...

पुढे जाण्यासाठी इतरांची संस्कृतीही समजून घ्या
अपरिचित संस्कृतीच्या लोकांसोबत काम करत असाल तर संस्कृतीतील बदल कमी करण्यासाठी कसे हातखंडे वापरता यावर तुमचे यश असते. तुम्ही ग्लोबल टीमला लीड करत असाल किंवा एखाद्या कंत्राटाच्या वाटाघाटी करत असाल, हेच लागू पडते. उदा: वैयक्तिक अथवा एकत्रित संस्कृतीत करीत असा. ग्लोबल टीम स्वत:ला स्वतंत्र समजते? स्वत:ला एखाद्या मोठ्या ग्रुपचा घटक मानते? ते वैयक्तिक यश साजरे करतात? टीममध्ये काही स्टार परफॉर्मर आहेत ज्यांच्याकडे सर्व सुविधायुक्त मोठे कार्यालय आहे. त्यांच्या बोलण्याची योग्य दखल घेतली जाते. बहुतांश त्यांच्या मताशी असहमती व्यक्त करतात तेव्हा त्यांना ते पटते का? या प्रश्नांची उत्तरे होकारार्थी असल्यास ही वैयक्तिक कामगिरीला महत्त्व देणारी संस्कृती समजावे. जिथे जास्त लोक काम करतात तिथे झाकले गेलेले परफॉर्मर शोधावे लागतील. हे स्टार नसतील, मात्र त्यांची कामगिरी चांगली असेल. उत्कृष्ट निष्कर्षासाठी संघभावनेवर लक्ष केंद्रित करा आणि ग्रुपच्या यशासाठी प्रेरणा द्या.
(स्रोत : ब्रिजिंग टू काउंड्स कल्चरल डिफरन्सेस)

योग्य कारण समजल्यास अडचणी सोडवू शकाल
कार्यालयात कधी सहकाऱ्याशी भांडण, वादविवादासारख्या गंभीर गोष्टी झाल्याचा अनुभव आला असेल. वादानंतर बहुतांशी निराशाजनक भावना होते. यातून बाहेर पडण्यासाठी दोन कामे करा- समस्येकडे संपूर्ण दुर्लक्ष किंवा समाेरच्याची माफी मागा. मात्र, समस्या मिटवण्याची ही योग्य पद्धती नव्हे. संघर्ष चार पद्धतींचा असू शकतो. रिलेशनशिप, टास्क, प्रोसेस आणि स्टेटस( कंपनीत तुमच्या असणाऱ्या पदावरून नाराजी). या चार गोष्टी लक्षात घेतल्यावर समस्येचे नेमके कारण काय हे कळेल. कशामुळे त्रास होतो, त्याचे कारण काय? कारण समजताच त्याची सोडवणूक करणे सोपे जाते.
(स्रोत : एचबीआर गाइड टू मॅनेज कॉन्फ्लिक्ट अॅट वर्क, बाय अॅमी गॅलो)
बातम्या आणखी आहेत...