आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घेरदार घागरा आता पुन्हा फॅशनमध्ये!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रंग आणि प्रिंट्समध्ये प्रयोगांसह डिझायनर्सनी स्कर्टसला पुन्हा लोकप्रिय बनवले. बंजारा, एथनिक आणि मॉडर्न लूक असलेले स्टायलिश स्कर्ट बनू लागले. सॅलब्सपासून प्रत्येक मुलीच्या आवडीचे झाले.

स्कर्ट्‌्समध्ये हल्ली अनेक प्रकारचे प्रयोग पहायला मिळत आहेत. फ्लोरल आणि लांब ओल्ड स्टाइल स्कर्टमध्ये सातत्याने बदल होत आहे. डिझायनरच्या चांगल्या प्रयोगामुळे महाविद्यालयात जाणाऱ्या मुलींपासून ते सेलेब्सपर्यंत सर्वांचाच फॅशन स्टेटमेंट बनवला आहे. बॉलीवूड अभिनेत्री करिना कपूर सिंघम रिटर्नमध्ये ब्राइट निळ्या रंगाचा फ्लोरल आणि लाल रंगाच्या बंजारा स्टाइल स्कर्टमध्ये दिसली. ती त्या वेळी खूप प्रसिद्ध झाली हाेती.

नुकताच अमेजन इंडिया फॅशन आठवडा २०१५ मध्ये अनेक डिझायनर्सने स्कटर्सला वेगवेगळ्या पद्धतीने फ्रेश लूक दिला आहे. डिझायनर अनुपमा दयालने पावडर ब्लू स्कर्ट‌्सला लोधी काळात जामली कामलीने प्रभावीत होऊन प्रदर्शित केले होते. यात संॅडस्टोन्सने प्रभावीत लाल, गेरूच्या रंगाचे हलके शेड‌्स समोर आले. अनुपमा यांचे म्हणणे आहे, स्कर्ट‌््ससाठी ललित जाळीदार फॅब्रिक, हल्के शिफॉन, सिल्क आणि कॉटन फेब्रिकला सर्वाधिक पसंती मिळते. या डिझाइनच्या मागे अनुपमा यांचा मुगलची राणी नूरजहाँ यांची संुदरता दाखवण्याचा विचार होता. मुगल टच देण्यासाठी यावर मुगल काळातील फुलांची डिझाइन, इस्लामिक ग्राफिक्स आणि लाल गुलाबांचा चांगल्या पद्धतीने वापर केला होता.

उन्हाळ्यात हे स्कर्ट‌््स खूप आरामदायी असतात. याला चोली स्टाइल ब्लाऊज आणि टी शर्ट सोबत मॅच करता येते. डिझायनर हर्षिता गौतमने घागऱ्याला नवीन आयाम दिला आहे. ती म्हणते, मी मुंबई-पुणे महामार्गावर मीना नावाच्या महिलेला भेटली आणि तिची फॅशन आणि तिच्या कपड्यांची चाहती झाली. तिने आपल्या हातांनी काही घागरे माझ्यासाठी शिवले. आम्ही देशातील बंजारा समाजाशी प्रभावित होऊन त्यांची डिझाइन बनवतो. बहुदा आमच्या घागरा आणि लांब स्कर्ट कॉटन कापड्यांमध्ये उठून दिसतात. घागरा जुन्या काळापासून भारतीय ग्रामीण महिलांचा आवडीचा आहे. आता सर्व मेहनत त्याला ट्रेडिशनलहून मॉडर्न लूक देण्यासाठी आहे. घागऱ्यास अनेक स्टाइल गुरुंनी नवीन ओळख दिली आहे. डिझायनर तन्वी कोडियाने अनेक क्लॅिशंग रंग आणि प्रिंटससोबत त्यावर एंब्रायडरी करून घोडे आणि हत्ती बनवले. सोबत मिरर वर्क देखील केले आहे. तन्वी म्हणते, प्रत्येकवेळी पारंपरिक वस्तूंना आव्हान असेल याकरिता रंग नेहमीच डार्क ठेवते. अहमदाबादच्या आशिष, विक्रांत विरलने घागऱ्यावर ब्लॉक प्रिंटिंग आणि कलमकारी केली आहे. त्यामुळे ऑर्गेनिक अनुभव कायम राहतील. तरुण डिझायनर साहिल कोचरने काळ्या रंगांची जादू करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी ब्लाउजमध्ये कटवर्क, लेस आणि मुरड घालण्याचे काम केले. त्यांच्या प्रयोगांना पसंती मिळाली.