आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Harvard Business Review: सदस्यांच्या वैयक्तिक योगदानाला महत्त्व द्या

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बिझनेसमध्ये संशोधनपर अभ्यास केल्यासच सोशल मीडियाचा फायदा होऊ शकतो. वेेगवेगळे स्वभाव आणि मत असलेल्या लोकांना प्रभावित करण्यासाठी हे सर्वात सोपे आणि स्वस्त माध्यम आहे. तसेच टीम परफॉर्मन्समधील प्रत्येक सदस्याचे वैयक्तिक योगदान ओळखण्यासाठी हार्वर्ड बिझनेस रिव्ह्यूमधून...

१५ मिनिटांच्या ४ ब्रेकऐवजी १ तासाचा ब्रेक
आठवड्यातील १६८ तास सर्व व्यावसायिक, सामाजिक आणि वैयक्तिक कामांसाठी पुरसे असतात. मात्र, वेळ कसा जातो, हे कळत नाही. यासाठी आपल्याकडील वेळ तुकड्यांमध्ये विभागू नका. समजा आपल्याकडे एक तास वेळ असेल, तर त्याचे १५-१५ मिनिटांचे चार भाग करू नका. तांत्रिकदृष्ट्या वेळेकडे पाहू नका. प्रत्येक वेळी ई-मेल चेक करण्याऐवजी त्यासाठी एक वेळ ठरवून घ्या आणि सहका-यांना याविषयी स्पष्ट सांगा. काही कामे करताना आनंद मिळतो, मात्र त्यात वेळही खूप वाया जातो. उदा. टीव्ही पाहणे किंवा एखादा खेळ खेळणे. यासाठी एक ठरावीक वेळ निश्चित करावा आणि त्या वेळापत्रकानुसारच प्रत्येक गोष्टीसाठी ठरावीक वेळ द्यावा. एका वेळी एकच काम करा. (स्रोत- रिलॅक्स, यू हॅव्ह १६८ आवर्स धिस वीक, स्कॉट बेहसन)

रिसर्चनंतर सोशल मीडियावर जाहिरात द्या
सोशल मीडियावर इतर माध्यमांपेक्षा जाहिरात देणे परवडते. तसेच विविध स्तरांतील ग्राहकांना लक्ष्य करणेही सोपे पडते. अशा जाहिराती देण्याची पद्धत माहिती असल्यास या माध्यमाचा प्रभावीपणे उपयोग करून घेता येतो. सोशल साइट्सचे विशिष्ट टार्गेट फीचर्स असतात. फेसबुक इंटरेस्ट ग्रुप, ट्विटर डेमोग्राफी आणि लिंक्डइन इंडस्ट्री तसेच जॉब टायटलच्या आधारे माहिती फिल्टर केली जाते. जाहिरातीसाठी पैसे देण्यापूर्वी आपल्या गरजा लक्षात घ्या. या साइट्सवरील मोफत सेवांचा लाभ घेताना कोणत्या प्रकारचे मेसेज जास्त प्रभावी असतात, हे समजून घ्या. जाहिरातींमध्ये अशा मेसेजचा वापर करा. मात्र, एक मेसेज एकाच ग्रुपला वारंवार पाठवू नका.
(स्रोत : व्हेन अँड व्हाय टू पे फॉर ट्विट्स, रियान होम्स)

आकड्यांसह भावनांनाही प्रेझेंटेशनमध्ये जागा द्या
प्रोजेक्ट प्रेझेंटेशन असो वा बिझनेस प्लॅन, मॅनेजमेंट अथवा टीममधील सदस्यांचे सहमत मिळवण्यासाठी त्यात भावनाही एकवटल्या पाहिजेत. तथ्य किंवा आकड्यांनी प्रेझेंटेशन प्रभावी बनते, मात्र लोक भावनिक पातळीवर त्याशी जोडले जात नाहीत. सर्वात आधी प्रकल्पाची गरज ओळखा आणि त्याच्या परिणामांविषयी माहिती द्या. आयुष्यात येणा-या व्यावहारिक परिस्थितींशी आपला प्लॅन जोडा. त्याची मानसिक गरज ओळखा. तंत्रज्ञानावर अधिक भर न देता या प्लॅनने कंपनीच्या ग्राहकांना काय फायदा होईल किंवा कर्मचा-यांसाठी तो कसा उपयुक्त आहे, हे समजावून सांगा.
(स्रोत : द राइट वे टू प्रेझेंट युअर बिझनेस केस, कॅरोलिन ओहारा)

कामाच्या पद्धतीऐवजी परिणामांकडे लक्ष द्या
टीमवर्कमध्ये सदस्यांच्या परफॉर्मन्सचे वैयक्तिकपणे आकलन करणे कठीण असते. कारण यात एकाच वेळी अनेक जण एकाच प्रकल्पासाठी काम करत असतात. मात्र, सर्वांनाच आपल्या कामाची ओळख निर्माण करायची असते. काम पूर्ण झाल्याचे क्रेडिट कुणाला, किती द्यायचे, याचा विचार समजूनच करायला हवा. टीमचा परफॉर्मन्स किती उत्कृष्ट आहे, यावर प्रत्येक सदस्याचे योगदान कळू शकते. कामाची पद्धती पाहण्याऐवजी परिणामांना प्राथमिकता द्या. रिवॉर्ड सिस्टिम ध्येयावर आधारित हवी. स्टाफ किती जुना आहे किंवा दररोज किती तास काम करायचे आहे, या कारणांमुळे परफॉर्मन्सवर परिणाम कधीतरीच होतो. त्यामुळे रिवॉर्ड देण्यासाठी हा आधार मानू नका. यश अथवा अपशय मिळाले तरी टीमच्या प्रयत्नांचे कौतुक जरूर करा. त्यामुळे नवे आणि उत्कृष्ट परिणाम मिळण्याची हमी असते.

टीम परफॉर्मन्सवर मतभेदांचा परिणाम नको
टीममधील सदस्यांदरम्यान असलेल्या मतभेदांमुळे कामावर परिणाम होत असल्यास त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. अशा परिस्थितीत दोन्ही पक्षांतील मते विचारात घेतली जावीत. प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार मिळावा. आपण समोरील व्यक्तीची परिस्थिती समजू शकतो, हे दाखवून द्या. मात्र, टीममधील मतभेदांमुळे उर्वरित सदस्यांवरही याचा प्रभाव होऊ शकतो, याची जाणीव करून द्या. समस्या सोडवण्याचा सल्ला द्या आणि आवश्यक असल्यास त्यासाठी मदत करा. आपण मदत करू शकत नसल्यास त्यासाठी योग्य व्यक्तीची निवड करा.
(स्रोत- व्हेन टू ऑफ युअर को-वर्कर्स आर फायटिंग, एमी गॅलो)