आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

खासगी प्रश्नांची अशी द्या चपखल उत्तरे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘काय मग लाडू कधी खाऊ घालताय?’ ‘काय हो, ही वस्तू किती रुपयांना घेतली?’ अशा किंवा या प्रकारच्या अनेक प्रश्नांचा सामना आपल्यापैकी प्रत्येकालाच कधी ना कधी करावा लागतो. या प्रश्नांची काहीच उत्तरे नसतात. या प्रश्नाकडे फारसे लक्ष न देता थेट बगल देऊन आपले लक्ष दुसरीकडे वळवा किंवा गप्पांचा विषय बदलण्याचा प्रयत्न करा. नाही तर मग समोरच्याने विचारलेला प्रश्न तुम्ही ऐकलाच नाही, असा आविर्भाव आणा. दुस-या कोणाशी तरी बोलत बोलत तुम्ही तेथून सटकूही शकता.


जर तुमचा जवळचा मित्र किंवा नातलगाकडून असे प्रश्न विचारण्यात येत असतील, तर उत्तरे न टाळता तुम्ही त्या प्रश्नांची थेट उत्तरे द्यायला हवीत. अशा प्रकारच्या प्रश्नांची उत्तरे देण्याची आपली कधीच मानसिक तयारी असत नाही किंवा या विषयावर कधी तरी इतर दिवशी सविस्तर चर्चा करू, असे त्यांना सांगा. हे सांगत असताना तुमच्या आवाजात मात्र मार्दव असू द्या. जेणेकरून समोरच्या व्यक्तीचे मन दुखावले न जाता त्याला तुमच्या भावना समजतील. त्यामुळे तुमच्या नात्यावर काहीही परिणाम होणार नाही.


काही नातेवाइकांना मात्र वारंवार हे किंवा असे प्रश्न विचारण्याची सवय असते. प्रत्येक वेळी भेट होताच ते या प्रश्नांची सरबत्तीच सुरू करतात. त्यांचा सामना करण्याचे दोन मार्ग आहेत, एक तर गप्पांचा विषय बदलण्याचा प्रयत्न करा, तसे केल्याने त्यांच्या लक्षात येईल की, तुम्हाला हे आवडलेले दिसत नाही. किंवा दुसरा मार्ग तुम्ही त्यांच्यावर अशाच प्रश्नांचा भडिमार करा. एक-दोनदा नव्हे, वारंवार करा. असे प्रश्न विचारल्याने कसा कोंडमारा होतो, हे त्यांच्या तेव्हाच लक्षात येईल.