आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

टीमला द्या सृजनशील कल्पना करण्याचे आव्हान

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


केवळ विचार करत राहणे आणि कोणतेच पाऊल न उचलणे कोणताही विचार न करता पाऊल टाकण्याएवढेच हानिकारक आहे. दिवसातील काही वेळ विचार करण्यासाठी द्या आणि उर्वरित वेळात काम करा. असे केल्यामुळे कामामध्ये सृजनशीलता दिसून येईल. उत्पादनही वाढेल. हार्वर्ड बिझनेस रिव्ह्यूने या संबंधी दिलेली माहिती...


असे करा चुकाविरहित सादरीकरण
सादरीकरण करताना ऐनवेळी गॅझेट नादुरुस्त होऊन व्यत्यय येऊ शकतो. बोलत असताना मायक्रोफोन बंद पडणे किंवा स्क्रीनवर स्लाइडच दिसणार नाही, असे टेक्नो- सॅव्ही लोकांबरोबरही होऊ शकते. सादरीकरण करण्यापूर्वी या बाबींकडे लक्ष द्या...
० ऑडिओ- व्हिज्युअलचे व्यवस्थापन करणा-या सदस्यांशी मैत्री करा. त्यांच्याशी चांगले संबंध ठेवा. त्यामुळे तुमचे सादरीकरण सुरू असताना ते अधिक लक्ष देतील.
० सादरीकरणाआधी प्रोजेक्टर, क्लिकर आणि बाकीचे ऑडिओ-व्हिडिओ गॅझेट तपासून घ्या. त्यामुळे आत्मविश्वास वाढेल.
० एखादे गॅझेट व्यवस्थित काम करत नसेल तर तुम्ही स्वत:चे गॅझेटही वापरू शकता. त्यामुळे परफॉर्मन्स चांगला होईल.
(स्रोत : हार्वर्ड बिझनेस रिव्ह्यू ‘गाइड टू पर्स्युव्हेसिव्ह प्रेझेंटेशन’)


दिवसातील काही वेळ विचार करण्यासाठी द्या
दुस-यांकडून काम घेताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागू शकते. चांगला लीडर टीमचा या अडचणींपासून बचाव करतो. या पद्धतींनी तुम्ही तुमच्या टीमला निकडीच्या कामावर लक्ष केंद्रित करण्यासाठी प्रेरित करू शकता...
० बैठकीत बॉसच्या प्रतीक्षेत वेळ वाया जातो. बॉसकडून कामाबाबत माहिती घेण्याच्या प्रतीक्षेतही वेळ जातो. लीडर म्हणून उत्पादन प्रभावित करण्याची तुमची इच्छा नसते.
० टीमला विचार करण्यासाठी थोडा वेळ द्या. ते ई मेल किंवा मॅसेज करून तुम्हाला लगेचच उत्तर देतील, अशी अपेक्षा करू नका.
० टीमला मोकळे वातावरण द्या. त्यामुळे ते प्रत्येक गोष्ट सहजतेने करू शकतील. समस्यांची लवकर सोडवणूक होईल. उत्पादनात वाढ होईल.
(स्रोत : ‘द बॉस अ‍ॅज ह्यूमन शील्ड’, लेखक : रॉबर्ट आय. सुटन)


तंत्रज्ञान खरेदी करण्याआधी फायदे बघा
कंपनीसाठी नवीन उपकरणे किंवा तंत्रज्ञान खरेदी करण्यापूर्वी ते किती फायदेशीर आहे, हे आधी तपासून पाहा. ते माहिती करून घेण्यासाठी स्वत:शीच हे प्रश्न विचारा: एक-जे काम अन्य लोक करत आहेत, तुम्ही त्याच्या उलट केले पाहिजे काय? उदा- प्रतिस्पर्धी डाटाबेसवर ई-न्यूजलेटर तयार करत आहेत तर तुम्ही चांगल्या क्लायंटला पर्सनल नोट पाठवू शकता. दोन- एखादे चांगले तंत्रज्ञान पुन्हा उपयोगात आणण्याची आवश्यकता आहे काय? अनेकदा एखाद्या कारणास्तव मार्केटिंग स्ट्रॅटेजी बंद करण्यात येते. मात्र, त्याचे कारण स्पष्ट असत नाही. त्यासाठी ती पुन्हा सुरू करण्याकरिता एखादे जुने तंत्र आहे काय? (स्रोत : ‘मार्केट्स, गो बॅक टू बेसिक्स’, लेखक : डोरी क्लार्क)


चांगल्या कल्पानांवर चर्चा केल्याने फायदा होईल
टीमचे सदस्य लीडरच्या मतावर संमती दर्शवतात. ते स्वत: होऊन इनोव्हेटिव्ह किंवा क्रिएटिव्ह काम करण्यासाठी पुढाकार घेत नाहीत. सर्जनशील कल्पनांसाठी टीमला विचारमंथन करायला सांगा. त्यांना वेगळ्या ढंगात विचार करण्यासाठी उद्युक्त करा.
० त्यांना विषयाशी संबंधित प्रत्येक पैलूंवर कल्पना मांडायला सांगा. कल्पना मांडल्यानंतर तिच्यावर चर्चा केल्याने फायदा होईल.
० चर्चेनंतर एखाद्या सदस्यांच्या भावनांना धक्का पोहोचला नाही ना किंवा कल्पना रद्द केल्यामुळे एखाद्याला वाईट तर वाटले नाही ना, याची टीमच्या सदस्यांकडे विचारणा करा.
० व्यवस्थित वर्तन न करणा-या सदस्याला पुढच्या वेळी चांगला व्यवहार करायला सांगा.
(स्रोत : ‘इट अ‍ॅज अप टू यू टू स्टार्ट अ गुड फाइट’, लेखक : रॉबर्ट आय. सुटन)


वादविवादांकडे सकारात्मक पाहा
कार्यालयात भांडणतंटे ही सामान्य बाब आहे. अनेकदा एखादी गोष्ट सोडून दिल्याने समस्या उद्भवतात. कार्यालयातील वादविवादांकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहा...
० तुम्हाला काही तरी म्हणायचे होते पण तुम्ही गप्प राहिलात? तुम्ही वादापासून स्वत:ला दूर ठेवण्याचा प्रयत्न करता? हे स्वत:शीच विचारा.
० भांडणतंट्यांना सकारात्मक स्वरूप देण्याच्या तुमच्या प्रयत्नाबद्दल मित्र किंवा सहका-यांशी चर्चा करा. ते तुमच्या व्यक्तिमत्त्वाशी संबंधित वेगळ्या पैलूंची ते माहिती देऊ शकतील.
० एका रात्रीतूनच खूप मोठा बदल घडवून आणण्याची गरज नाही. जेव्हा तुम्हाला कोणी काही बोलायला सांगेल तेव्हा गप्प बसा आणि मग काय घडते ते पाहा.

(स्रोत : ‘इज यूवर कल्चर टू नाइस?’, लेखक : रॉन अ‍ॅशकेन्स)