आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रीम रंगातील पारंपरिक ड्रेसला ग्लॅमरस डिझायनिंगची झळाळी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
या वेळी कॉट्यूर फॅशन वीक मध्ये क्रीम रंग विविध प्रकारांत सादर करण्यात आला. डिझायनर मनीष मल्होत्रा, अंजू मोदी, अनामिका खन्ना, गौरव गुप्ता यांच्या कलेक्शनमध्ये या रंगाचे वर्चस्व दिसून आले. नेहमीचा भडक रंग वधूपोशाखात कंटाळवाणा वाटत असल्याचे अनामिका यांनी सांगितले.

गेल्या 15 वर्षांपासून क्रीम रंग माझ्या कलेक्शनचा अविभाज्य घटक झाला आहे, असे अनामिका खन्ना यांनी सांगितले. पूर्वी केवळ धोती व पँट्स बनवण्यासाठी या रंगाला प्राधान्य दिले जात असे. मात्र आता या रंगात विविध प्रकारचे स्कर्ट्स व नवनवीन जॅकेटही बनत आहेत.
डिझायनर मनीष मल्होत्रा यांनीही क्रीम रंगात शेरवानी रॅम्पवर उतरवली. या शेरवानीवर काश्मिरी थ्रेडवर्क व मुघल मोटिफने शाही टच दिला होता. यावर फारसी पायजमा वापरण्यात आला. मनीष म्हणतात, क्रीममध्ये अनेक शेड्स आहेत, हेच या रंगाचे बलस्थान आहे. हा डोळ्यांना शांत वाटतो व ग्लॅमरसही. या रंगात एक रूबाब आहे. मनीष यांच्या शेरवानी रॉ सिल्क मटेरियलच्या होत्या. शेरवानीला हाय कॉलर असून त्यावर जरीवर्क आहे.
डिझायनर अंजू मोदीचे ‘मणिकर्णिका’ हे कलेक्शन आधुनिक स्त्रीला समर्पित होते. त्यात पारंपरिक छटाही विशेष पद्धतीने वापरण्यात आल्या होत्या. त्यांनी धोतीत काही वेगळ्या
डिझाइन्स दिल्या. धोतीच्या निºयांत तलम सिल्क व हार्ड टस्सर यांचे मिक्सिंग आहे. हे नव्या प्रकारचे डिझायनिंग असून त्याचा फॉलही चांगला आहे. अंजू यांच्या मते महिलांच्या पसंतीत बदल येत असल्याने, पेस्टल शेड्सना प्राधान्य देण्यात येत आहे. भडक रंगापेक्षा ड्रेसची प्रभावी शिवण महत्त्वाची आहे. त्यांनी गोटावर्कच्या धोतीला कशिदाकारीच्या ट्युनिकसोबत सादर केले. त्यांचे ब्ल्यू क्रॉप्स जॅकेटचे विशेष आकर्षण ठरले. डिझायनर सुलक्षणा मोंगा यांनी सिल्क लेहंग्यांची खास श्रेणी सादर केली. यात नेटलेयर व फ्लोरल कशिदाकारी केली होती. त्यांनी नव्या व जुन्या संकल्पनांना गडद गुलाबी रंगात सादर केले. डिझायनर गौरव गुप्ता यांनी क्रीम रंगात इव्हिनिंग व ब्रायडल गाउन्स सादर केले.

छायाचित्र - कॉट्यूर फॅशन वीकमध्ये क्रीम रंगच प्रकाशझोतात राहिला. अनेक डिझायनर्सनी सादर केलेले क्रीम कलरमधील काही निवडक डिझाइन्स.

(लेखिका 20 वर्षांपासून फॅशन लेखनातील प्रसिद्ध नाव नवी दिल्ली)