आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लॅबमधील बटाटे, सफरचंद, अननसाचा स्वादच निराळा, लवकरच नवे जीएमओ फूड

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फळांच्या निर्मितीत उच्च तंत्रज्ञानाचा वापर वाढत आहे. अमेरिकेतील दुकानांत लवकरच जेनेटिकली मोडिफाइड आॅर्गेनिज्मच्या रूपात गुलाबी अननस, डागविरहित बटाटे आणि काळे न पडणारे सफरचंद दिसेल. प्रश्न हा आहे की, लोकांना हे खायला आवडेल का? तसे संशोधनाचे अनेक संकेत मिळाले आहेत की, जीएमओ खाण्यासाठी सुरक्षित आहे. १८ राज्ये असा कायदा करत आहेत. ज्यामुळे जीएमओ फूडवर लेबल लावावे लागेल.

काही तज्ञ्ज म्हणतात, भूकबळी कमी करणे, कीटकनाशकांचा वापर कमी करणे आणि स्वास्थ्यवर्धक अन्न बनवण्याचे दावे जीएमओ पूर्ण करू शकत नाही. पर्यावरणतज्ञ्ज जोनाथन फोलेचे म्हणणे आहे की, जीएमओ अापल्या बऱ्याच अपेक्षा पूर्ण करू शकलेले नाही.

गुलाबी अननस
डेल मोंट कंपनीने विस्तृतपणे सांगितलेले नाही. दस्तावेजांमुळे समोर आले आहे की, कंपनीने गुलाबी बुंध्याचे अननस विकसित केले आहे. यात कर्करोग व हृदयरोगाचा धोका कमी करणाऱ्या लाइकोपीन अँटीऑक्सिडेंटची अधिक मात्रा आहे.

स्वच्छ बटाटे
जे. आर. सिंपलेट कंपनीच्या बटाट्यांवर ४०% कमी डाग असतील. हे बटाटे फ्राय करण्यावेळी कार्सिनोजेनिक केमिकल-एक्रिलामाइड कमी मात्रेत सोडेल. कार्सिनोजेनिक केमिकल्सने कर्करोग होऊ शकतो.

सफरचंद काळे पडणार नाही
ओकानागन स्पेशलिटी फ्रूट्स असे सफरचंद बनवत आहेत जे कापल्यानंतर रंग बदलणार नाहीत. कंपनीचे म्हणणे आहे की, नवीन सफरचंद अन्य स्नॅक फूडच्या स्पर्धेत टिकाव धरतील.