आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Indian Government Launch Military Operation For Goa Freedom

आज गोवा मुक्तीसंग्राम दिन, अशी झाली होती पोर्तुगीजांच्या दडपशाहीतून सुटका

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो- स्वातंत्र्यसैनिकांना अटक करुन घेऊन जाताना गोवेकरी पोलिस.)
भारतीय लष्कराने गोवा, दमण व दीव हा पोर्तुगीज भारतातील प्रदेश 19 डिसेंबर 1961 रोजी मुक्त केला. दादरा व नगर हवेली हा पोर्तुगीज भारतातील प्रदेश यापूर्वीच मुक्त करण्यात आला होता. गोव्याच्या मुक्तीबरोबर पोर्तुगीजांचे भारतातील सुमारे 450 वर्षांचे साम्राज्य समाप्त झाले.
भारत भूमीवरील पोर्तुगीज अधिपत्य 1961 च्या युद्धानंतर समाप्त झाले. गोवा, दमण व दीव हा प्रदेश संपूर्णपणे मुक्त झाला. 1961 चे युद्ध हा गोवा मुक्ती आंदोलनाचा शेवटचा व अत्यंत महत्त्वपूर्ण टप्पा होता. तरीसुद्धा आपणास हे लक्षात घ्यावे लागेल, की हे मुक्तियुद्ध म्हणजे गोवा मुक्ती आंदोलनाचा फक्त एक लहानसा, पण तेवढा निर्णायक भाग होता. या युद्धाव्यतिरिक्त गोवा मुक्ती आंदोलनाचा खूप मोठा इतिहास आहे. स्थानिक गोवेकर स्वातंत्र्यसैनिकांचा यात सिंहाचा वाटा आहे. त्यामुळे केवळ 1961 च्या युद्धाला गोवा मुक्ती आंदोलन म्हणणे चुकीचे ठरेल.
उभे झाले आंदोलन
क्रूर धोरणे, निरंकूश आदेश आणि हिंदू समाजाचे ख्रिश्चन समाजात धर्मांतर करण्याच्या नितीला सामान्य गोवेकरी त्रासले होते. गोवा सरकारविरुद्ध गोवेकरांनी तब्बल 14 वेळा सशस्त्र लढा दिला. पण त्याचा शेवट स्वातंत्र्यात झाला नाही. स्वरुप स्थानिक असल्याने आणि सामान्यांचा सक्रीय पाठिंबा नसल्याने हे उठाव यशस्वी होऊ शकले नाहीत.
मिळाला मोठा पाठिंबा
1940 नंतर गोवा मुक्तीसंग्रामाने जोर पकडला. भारतीय स्वातंत्र्यलढ्याला येणारे यश बघून सामान्य गोवेकरांना स्वातंत्र्याचे खऱ्या अर्थाने वेध लागले. विशेष म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारतीय नेत्यांनी पोर्तुगीज आणि फ्रेंच यांच्या ताब्यात असलेल्या प्रदेशांच्या स्वातंत्र्यावर लक्ष केंद्रीय केले. पण भारत पाकिस्तानच्या फाळणीमुळे पुन्हा भारतीय नेत्यांचे लक्ष गोव्याच्या मुक्तीसंग्रामावरुन भरकटले. गोव्यावर पोर्तुगीजांनी पकड मजबूत केली.
भारतातील घडामोडी शांत झाल्यावर पंतप्रधान पंडित नेहरु यांनी गोव्याच्या स्वातंत्र्यावर भर दिला. पण गोव्याचे भारतात विलिनिकरण करण्याच्या बाजूने पोर्तुगीज नव्हते. नेहरु यांनी भारत आणि पोर्तुगीज कॉलनीत चांगले संबंध राहण्याच्या दिशेने पाऊले उचलली. पण या कॉलन्यांमधील प्रशासक भारताला सहकार्य करीत नव्हते. अखेर नेहरु यांनी संयुक्त राष्ट्रसंघाच्या माध्यमातून पोर्तूगीजांवर दबाव आणला. शांततेच्या मार्गाने भारत सोडून जाण्याचा संदेश दिला.
आझाद गोमंतक दल
विश्वनाथ लवंडे, नारायण हरी नाईक, दत्तात्रय देशपांडे, प्रभाकर सिनारी आणि त्यांच्या मित्रांनी आझाद गोमंतक दलाचा स्थापना केली. त्यांनी पोर्तुगीज स्टेशन्स आणि बॅंकांवर अनेक हल्ले चढवले. या सर्वांना गोवा सरकारने 28-29 वर्षांचा कारावास सुनावला. यातील लवंडे आणि देशपांडे कारागृहात पळून जाण्यात यशस्वी झाले. त्यांनी सशस्त्र लढा सुरुच ठेवला. या दरम्यान, भारतीय लष्करातील अधिकारी शिवाजीराव देसाई यांनी गोवा लिब्रेशन आर्मीचे स्थापना केली. या आर्मीने बॉम्बस्फोट घडवून आणून सोनाशी खाण बंद पाडली. अनेक ठिकाणी बॉम्बस्फोट, कारवाया करुन पोर्तुगीज सरकारला जेरीस आणले. भारतीय लष्कराने गोव्यावर आक्रमण केले तेव्हा अनेक पुलांचे रक्षण केले.
नेहरुंनी दिला अंतिम आदेश
वाटाघाटी यशस्वी होत नसल्याने तत्कालिन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांनी भारतीय लष्कराला कारवाईचे आदेश दिले. 18 डिसेंबर 1961 रोजी सुरु झालेली लष्करी कारवाई 19 डिसेंबर 1961 रोजी संपली. यावेळी भारतीय लष्कराला फार कमी विरोध झाला. अखेर गोव्याचे पोर्तुगीज गर्व्हनर-जनरल भारताला शरण आले.
पुढील स्लाईडवर बघा, गोवा मुक्तीसंग्रामाचे दुर्मिळ फोटो...