आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चांगला लीडर बनण्यासाठी समाज आणि पर्यावरणाचे नाते समजून घ्या

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आपण असामान्य परिस्थितीत जगत आहोत. यामुळे असे म्हणता येईल की, ‘आपल्याकडे जे आहे’ (व्हॉट इज), त्याचे रूपांतर ‘ जे असू शकते ’ (व्हॉट कॅन बी) मध्ये करण्यासाठी एकाच वेळी सर्व बाजूंनी असलेली अनुकूल परिस्थिती यापूर्वी कधीच नव्हती. नव्या युगात मानवी उद्यम हा एक नवा टप्पा आहे. त्यामुळे यशाची परिमाणे बदलली आहेत. यशासाठी आवश्यक असलेल्या पात्रतांमध्ये बदलही झाला आहे. त्याविषयी...

ताकदवान मासा दुर्बल माशाला खातो : औद्योगिकीकरणापूर्वीच्या काळात सुरक्षेचा हाच नियम होता. अलेक्झांडर द ग्रेट, रोमन, तुर्की, इंग्रज आणि स्पॅनिश या लोकांनी वर्चस्वासाठी हाच कायदा पाळला आणि लोकांनी हार पत्करून शक्तिशाली प्रशासनाचा त्यांच्या विशेषाधिकाराच्या रूपात स्वीकार केला.

मोठा मासा छोट्या माशाला खातो : जॉइंट स्टॉक कंपनीसोबत याची सुरुवात झाली. इसवी सन 1600 मध्ये ईस्ट इंडिया कंपनी आणि इसवी सन 1606 मध्ये व्हर्जिनिया कंपनीची स्थापना, अशा आर्थिक मॉडेल्सच्या रूपात झाली, ज्यात खूप कमी जोखीम होती. या मोठ्या माशांकडून राजाच्या राज्याला महसूल मिळत होता आणि त्याबदल्यात राजाकडून संरक्षण मिळत होते. यातून व्यापार आणि राजकारणादरम्यान क्रोनी कॅपिटॅलिझमचा जन्म झाला. परिस्थिती एवढी हाताबाहेर गेली की 1876 मध्ये तत्कालीन अमेरिकन राष्ट्रपती रुदरफोर्ड हेस म्हणाले होते की, लोकशाही ही व्यावसायिक घराण्यांचे व्यावसायिक घराण्यांकडून आणि व्यावसायिक घराण्यांसाठी चालवलेले शासन बनले आहे. 1912 मध्ये थिओडोर रुझवेल्टने म्हटले की, प्रत्यक्ष दिसणार्‍या सरकारच्या मागे आणखी एक अदृश्य सत्ता आहे. हे अदृश्य सरकार नष्ट करून व्यवसाय व राजकारणातील अभद्र युती फोडणे आवश्यक आहे. मात्र त्यानंतर जगातील परिस्थिती आणखी ढासळली आणि कॉर्पोरेट घराणे हे राजकीय भ्रष्टाचाराचे मुख्य कारण बनले आहे.

वेगवान मासा मंद माशांना खातो : याची सुरुवात अंतरावर मात आणि इंटरनेटच्या जन्माने झाली. 1977 मध्ये अ‍ॅपल, 1981 मध्ये मायक्रोसॉफ्ट, 1995 मध्ये अ‍ॅमेझॉन आणि 1998 मध्ये गुगलची स्थापना झाली. या कंपन्यांनी आपल्या भागधारकांना एका वर्षात जेवढा नफा मिळवून दिला, तेवढा जुन्या कंपन्यांनी एका दशकातही दिला नव्हता.

हुशार मासा मूर्ख माशाला खातो : 21 व्या शतकाच्या सुरुवातीला भारताची टीसीएस, इन्फोसिस आणि विप्रो, ब्राझीलची इब्रेअर, चीनची हेअर, दक्षिण कोरियाची सॅमसंग या कंपन्यांनी नव्या युगाची सुरुवात केली. या कंपन्या खूप मोठ्या व बळकट आहेत. त्यांची कार्यपद्धती वेगवान असून ते खूप हुशार आहेत. प्रत्येक नव्या टप्प्याच्या प्रारंभामागील प्रमुख कारण म्हणजे नवे गुण आत्मसात करण्याची गरज. चार्ल्स डार्विनच्या सिद्धांताशी हे बर्‍याच अंशी मिळतेजुळते आहे. डार्विन म्हणतो की, ज्या प्रजाती बदल स्वीकारतील, त्याच वाचतील.

प्रत्यक्षातील मासे काल्पनिक माशांना खातात : आपण एकीकडे या प्रक्रियेचे विश्लेषण करत असतानाच या नव्या टप्प्यातील परिणामांचे संकेत दिसू लागले आहेत. यामागे प्रमुख दोन कारणे आहेत. सामाजिक जागरूकता आणि समाज व पर्यावरणाचा मेळ घालत काम करण्याची गरज. जे लीडर्स हे नवे वास्तव ओळखतील, तेच 21 व्या शतकात विजेते ठरतील. लीडरशिपची ही माहिती ‘क्वेस्ट फॉर एक्सेप्शनल लीडरशिप : मिराज टू रिअ‍ॅलिटी ’ पुस्तकातून घेतली आहे. यात लेखक रवी चौधरी यांनी रिइन्व्हेंटिंग लीडरशिपविषयी सांगितले आहे.

रवी चौधरी
‘क्वेस्ट फॉर एक्सेक्शनल लिडरशिप : मिराज टू रिअ‍ॅलिटी’ पुस्तकाचे लेखक, नवी दिल्ली